Agriculture news in marathi Farmers should not sell soybean seeds as prices have gone up | Agrowon

दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे विक्री करू नये

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून ठेवलेले सोयाबीन विक्री करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून ठेवलेले सोयाबीन विक्री करू नये, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

परभणी जिल्ह्यात सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर प्रती क्विंटल जवळपास ६ हजार रुपये असल्याने बरेच शेतकरी बाजारामध्ये त्यांच्याकडील राखीव असलेले सोयाबीन विक्री करत आहेत. परंतु येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचे दर हे ८० ते ९० रुपये प्रति किलो किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी राखीव असलेले गुणवत्तापूर्ण घरचे सोयाबीन बियाणे बाजारामध्ये विक्री करू नये व ते बियाणे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी वापरावे.

खरीप हंगाम २०२१च्या पेरणीच्या अनुषंगाने घरचे सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे राखीव ठेवले आहे. तसेच जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीन बियाणे उत्पादनासाठी  उन्हाळी सोयाबीन लागवड केली आहे. असे आळसे यांनी सांगितले.

खत विक्रेत्यांनी जुना खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताच्या बॅगची खरेदी करताना बॅगवरील किंमत व खत विक्रेत्याने बिलावर लावलेली किंमत, दर याची पडताळणी करूनच बॅगवरील किमतीपेक्षा जास्तीच्या दराने खताची खरेदी करू नये. खत विक्रेत्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला जुन्या दरातील रासायनिक खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.

सध्या खरीप हंगाम २०२१चे पूर्व नियोजन व उन्हाळी हंगाम पिके, ऊस या पिकांना रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी शेतकरी खत खरेदी करत आहेत. सध्या डीएपी १०:२६:२६, २०:२०:००:१३,  १६:१६:१६ आदि रासायनिक खताच्या दरामध्ये वाढ झाली आहे.


इतर बातम्या
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
माढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोटला पाऊससोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात...
उजनीचे पाणी पळविण्याचा प्रश्न...सोलापूर ः उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याला...
जळगाव जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाला गती...जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप गेल्या...
वार्सा येथे पाणीटंचाईशी पंधरा...वार्सा, जि. धुळे : धज्या आंबापाडा येथील...
बीडमध्ये वादळी पावसाचा दुसऱ्या दिवशीही...बीड : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा...
नांदेड जिल्ह्यात पावसाचा तडाखा सुरुच नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मुक्काम...
‘लिंबोटी’चे पाणी २३ गावांना मिळणारनांदेड : कंधार तसेच लोहा तालुक्यातील संभाव्य...
साताऱ्यात आले लागवडपूर्व कामांना गतीसातारा ः जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या शुभ...
पुणे बाजार समितीमध्ये लसीकरणाला प्रारंभपुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीच्या वतीने...
केवळ जाहिरातींद्वारे कोरोना संपणार नाही...मुंबई ः कोरोना परिस्थिती लक्षात घेता ‘एक देश एक...
कोरोनानंतर ‘कृषी’चा अनुशेष दूर करणार ः...नागपूर : विदर्भातच नाही तर राज्याच्या कृषी...
कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धसकाकोल्हापूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव...
बुलडाण्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांना...बुलडाणा : सातत्याने संकटाचा सामना करणाऱ्या...
कांदा बियाणे भेसळीचा शेतकऱ्यांना फटकाश्रीरामपूर, जि. नगर ः यंदा खरिपात कांदा उत्पादक...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...