Agriculture news in Marathi Farmers should produce improved varieties of seeds: Dr. Black | Agrowon

शेतकऱ्यांनी उन्नत वाण बियाणे उत्पादित करावे ः डॉ. काळे

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांनी उन्नत वाण बियाणे उत्पादित करून इतर शेतकऱ्यांना गाव पातळीवर दर्जेदार बियाणे उपलब्ध करण्यास हातभार लावावा. आपल्या शेतातील उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून शेतीपूरक व्यवसाय करावा. नवीन शिफारशीत वाणांचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसोबतच उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी केले.

वाशीम ः शेतकऱ्यांनी उन्नत वाण बियाणे उत्पादित करून इतर शेतकऱ्यांना गाव पातळीवर दर्जेदार बियाणे उपलब्ध करण्यास हातभार लावावा. आपल्या शेतातील उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून शेतीपूरक व्यवसाय करावा. नवीन शिफारशीत वाणांचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसोबतच उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी केले.

वाशीम कृषी विज्ञान केंद्राद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली व भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन पिकाचा समूह रेषा पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम या हंगामात राबविण्यात आला. या प्रात्यक्षिकांमध्ये सुधारित वाण लागवड तंत्रज्ञानातून पीक उत्पादन वाढ, कीड व रोग व्यवस्थापन इत्यादी बाबींवर विशेष लक्ष देऊन सोयाबीन पिकाचे शिफारस तंत्रज्ञान वापराद्वारे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. तसेच गाव पातळीवर नवीन वाणाच्या लागवडीद्वारे शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान प्रसार होतो. सोयाबीन प्रात्यक्षिकाअंतर्गत शेतकऱ्यांचे अनुभव व चर्चेकरिता कोंडाला झामरे येथे शुक्रवारी (ता. ११) कार्यक्रम झाला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. काळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच नितीन इंगोले, तसेच मार्गदर्शक म्हणून पीक संरक्षण तज्ज्ञ आर. एस. डवरे, फळबाग तज्ज्ञ एन. बी. पाटील, कृषी विद्या तज्ज्ञ टी. एस. देशमुख, कृषी अर्थतज्ज्ञ डी. एन. इंगोले उपस्थित होते.

प्रास्ताविक टी. एस. देशमुख यांनी केले. शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान माहिती करून घेत पीक उत्पादन वाढविण्यासाठी कृषिदूत म्हणून कार्य करावे, असे आवाहन केले. सोयाबीन पारंपरिक पीक वाण जेएस ३३५ मध्ये खोडमाशी व खोडकिडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सुधारित प्रतिकारक वाण एमएयूएस १५८ चा वापर करण्याची शिफारस त्यांनी केली. नितीन इंगोले यांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे गावपातळीवर घेतल्या जाणाऱ्या विविध कृषी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शेतकरी अशोकराव तायडे यांनी पीक नियोजनाची माहिती दिली. एस. एम. बोदडे यांनी आभार मानले.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...