शेतकऱ्यांनी डाळिंब विक्री व्यवस्था उभारावी ः शरद पवार

शेतीबाबतचे निर्णय आपण एकजुटीने घेत असल्याने त्याचा फायदा डाळिंब शेतीला अधिकाधिक मिळतो आहे. ही चांगली बाब आहे. तुम्ही दर्जेदार उत्पादन घेण्यात अग्रेसर झाला आहात. निर्यात देखील सुरू आहे. आता विक्री व्यवस्था उभारली पाहिजेत, ती देखील तितकीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
Farmers should set up pomegranate sales system: Sharad Pawar
Farmers should set up pomegranate sales system: Sharad Pawar

सांगली ः शेतीबाबतचे निर्णय आपण एकजुटीने घेत असल्याने त्याचा फायदा डाळिंब शेतीला अधिकाधिक मिळतो आहे. ही चांगली बाब आहे. तुम्ही दर्जेदार उत्पादन घेण्यात अग्रेसर झाला आहात. निर्यात देखील सुरू आहे. आता विक्री व्यवस्था उभारली पाहिजेत, ती देखील तितकीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथे शुक्रवारी (ता. १३) श्री. पवार यांनी डाळिंब बागांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. या वेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, अरुण लाड, प्रभाकर चांदणे उपस्थित होते. आमचं गाव दुष्काळी. परगावात मोलमजूरीला जायचो. मात्र, १९९० च्या दरम्यान, शरद पवार यांनी फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून प्रोत्साहन दिले. त्यातून डाळिंबाची लागवड केली. त्यामुळे आम्ही डाळिंब शेतीत यशस्वी झालो आहोत, असे या वेळी शेतकरी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले.

यावेळी श्री. पवार म्हणाले, की जगातील महत्त्वाच्या शहरांत डाळिंबाची निर्यात होत आहे. तरीही जगातील इतर शहरांत त्याची विक्री व्यवस्था कशी वाढता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी अलीकडच्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत शेतीमालाची विक्री करणे शक्य झाले. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कंपनी स्थापन करावी. म्हणजे त्याचा लाभ विक्री व्यवस्थेत होईल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून डाळिंब फळबागांना संरक्षण देण्यासाठी आच्छादन करण्यासाठी नेट सवलतीत देता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन ही श्री. पवार यांनी बोलताना दिले. या प्रसंगी जयंत पाटील, अनिल बाबर, प्रभाकर चांगणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अतिवष्टीमध्ये तुमच्या डाळिंब बागा टिकल्या कशा, असा प्रश्न शरद पवार यांनी खांजोडवाडी येथील शेतकऱ्यांना विचारला. त्यावर शेतकरी म्हणाले, की डाळिंब शेतीबाबतचा निर्णय आम्ही सामूहिकरीत्या घेतो. हे एकजुटीचे यश असल्याचे शेतकऱ्यांनी सांगताच श्री. पवार म्हणाले, शेताबाबत सामूहिक निर्णय घेण्याचे हे सूत्र राज्यातील इतर शेतकऱ्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com