कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा : सुनेत्रा पवार

कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा
कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

पुणे ः शिक्षण, नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने नागरिक शहरात जात आहेत. यामुळे शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना ग्रामीण भागातील जीवन अनुभवता येत नाही. शहरातील नागरिकांची गरज ओळखून शहरा लगतच्या शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तरच शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो, असे मत कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या (मार्ट) संस्थापक सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

मार्टमार्फत खेड तालुक्यातील चिंबळी येथे शेतकरी शंकर बहिरट यांनी सुरू केलेल्या स्वागत कृषी पर्यटनाचे उद्‍घाटन सोमवारी (ता. २८) करण्यात आले. 

या वेळी ग्रामीण व कृषी पर्यटन सहकारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, सचिव ॲड. विजय झोळ, सुदाम भोर, राहुल गोरे, डाॅ. कैलास बवले, चिदंबरेश्वर साखरे महाराज, चंदन मुऱ्हे, एकनाथ कराळे, शेतकरी चांगदेव बहिरट, गणेश बहिरट, नलिनी बहिरट, वृशाली बहिरट, उमा बहिरट आदी उपस्थित होते. 

सौ. पवार पुढे म्हणाल्या, ‘‘मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पाणी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून माहिती आहेत. पाण्याच्या बदलाचा जो काही परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी काहीतरी मार्ग असावेत, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून कृषी पर्यटने उघडली होती. ग्रामीण भागात शेतकरी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशीपालन असे जोडधंदे करत आहेत. याचबरोबर कृषी पर्यटन हासुद्धा चांगले पैसे मिळवून देण्याचा पूरक व्यवसाय ठरू शकतो. म्हणून मी पुणे, सातारा येथे जे-जे कृषी पर्यटने आहेत, तेथे जाऊन कृषी पर्यटनाचा बारकाईने अभ्यास केला.  यावेळी बाळासाहेब बराटे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी विकास गोडगे यांनी प्रास्तविक शंकर बहिरट यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com