Agriculture News in Marathi Farmers should turn to bamboo cultivation - Nitin Gadkari | Agrowon

शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे - नितीन गडकरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे न वळता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे.

लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे न वळता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे. आज देशाला ८ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागते. त्या ऐवजी तांदूळ, बांबूपासून इथेनॉल बनवले तर परकीय चलन वाचेल. २०२५ पर्यंत इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन घेणे आवश्यक आहे.

परदेशात जाणारे पैसे वाचले तर तेच शेतकऱ्यांच्या घरात ते येतील, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. 
लोदगा येथे केंद्र शासन, फिनिक्स फाउंडेशन आणि व्ही ई कमर्शिअल व्हेईकल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. गुरुवारी (ता. २५) झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून खासदार उन्मेश पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार विक्रम काळे, उपस्थित होते. यावेळी संस्थेचे प्रमुख माजी आमदार पाशा पटेल व परवेज पटेल यांनी सर्वांचे स्वागत केले. 

गडकरी म्हणाले, ‘‘देशाला आज २२ लाख तज्ज्ञ वाहन चालकांची आवश्यकता आहे. देशात प्रति तासाला होणाऱ्या अपघातात ४१५ जणांचा मृत्यू होतो. यात तरुणांची संख्या ७० टक्के आहे. वाहन चालविण्यासंदर्भात प्रशिक्षण गरजेचे आहे. यातूनच लोदगा (ता. औसा) येथे देशातील पहिली फिनिक्स आयशर वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यात आली आहे. याचे काम प्रेरणादायी ठरेल. रस्त्यांचा दर्जा सुधारला जात आहे. अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी अपघात निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून १५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाशा पटेल यांनी केले. 

शेतकरी ऊर्जादाता बनावा 
बांबू लागवडीसाठी पाशा पटेल यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचे कौतुक त्यांनी केले. बांबू हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. थर्मलमध्ये कोळशाऐवजी बांबूचा वापर करण्यास आता सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे भविष्यात बांबूला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. बांबू लागवडीतून वर्षाकाठी एकरी ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळने गरजेचे आहे. शेतकरी हा अन्नदाता तर आहेच पण आता त्याने ऊर्जादाता बनावे. स्वतःला तंत्रज्ञानाशी जोडून घ्यावे, असेही गडकरी म्हणाले. 
 


इतर बातम्या
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...