शेतकऱ्यांनी कोरडवाहू फळबागेकडे वळावे : कसपटे

शेतकऱ्यांनी कोरडवाहू फळबागेकडे वळावे : कसपटे
शेतकऱ्यांनी कोरडवाहू फळबागेकडे वळावे : कसपटे

सोलापूर : ‘‘दुष्काळाची तीव्रता वरचेवर वाढत आहे. पण ही समस्या कायमच आपल्याकडे असल्याने शेतकऱ्यांनी कोरडवाहू फळबागांकडे वळावे,'' असे आवाहन अखिल भारतीय सीताफळ संघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कसपटे यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) गोरमाळे (ता. बार्शी) येथे कसपटे यांच्या मधुबन फार्मवर जिल्हास्तरीय शेतकरी सल्ला समितीची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकल्प उपसंचालक विजयकुमार बरबडे होते. कसपटे यांनी त्यांच्या शेतावर स्वत: संशोधित केलेल्या एन. एम. के -१ (गोल्डन) या वाणाच्या सीताफळाविषयी लागवडीपासून मार्केटिंगपर्यंतचे मार्गदर्शन केले. बंगळूरच्या नॅशनल व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन युनिव्हर्सिटीकडून डॉक्‍टरेट पदवी मिळाल्याबद्दल कसपटे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बरबडे म्हणाले, ‘‘कसपटे यांचे कार्य खूपच उल्लेखनीय, प्रयोगशील आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांच्यात उमेद जागवणारे आहे. पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर एन. एम. के-१  (गोल्डन) सीताफळाची लागवड करावी. हे वाण सर्वगुणसंपन्न आहे. कमी कालावधीत उत्पन्न सुरू होते. टिकवन क्षमता जास्त, कमी पाणी, देखभाल खर्च कमी व उत्पन्न जास्त आहे.``

कृषी उपसंचालक रवींद्र माने, विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूरचे शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर, मधुबन ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कसपटे, सुलन कसपटे, कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे, शास्त्रज्ञ एम. बी. मोरे, प्रकल्प उपसंचालक मनोहर मुंढे, उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर, पांगरीचे मंडळ कृषी अधिकारी मिस्किन, नान्नजचे बारवकर, उत्तर सोलापूरचे डी. एल. मिलगे, प्रतिभा साठे, सतीश जाधव, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. कल्पक चाटी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन आरगडे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com