शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे ः डॉ. विश्वजित कदम

शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे सोडून आधुनिक शेतीकडे वळावे. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु हीच शेती आपण व्यावसायिक पद्धतीने केली पाहिजे. आहे त्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न काढले पाहिजे.
Farmers should turn to modern agriculture: Dr. Viswajit Kadam
Farmers should turn to modern agriculture: Dr. Viswajit Kadam

आळसंद, जि. सांगली :  शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे सोडून आधुनिक शेतीकडे वळावे. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु हीच शेती आपण व्यावसायिक पद्धतीने केली पाहिजे. आहे त्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न काढले पाहिजे. शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल प्रकल्प हा शेतकऱ्यांना दीपस्तंभ ठरेल, असा आत्मविश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

येथील ‘शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल’चे उद्घाटन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अनिल बाबर, आमदार वनश्री मोहनराव  कदम,  कृषी संचालक दिलीप झेंडे, शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक प्रतापराव साळुंखे, अध्यक्ष विठ्ठल साळुंखे, जितेश कदम, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत  शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ.  हणमंतराव कदम, तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार प्रमुख उपस्थित होते.

आमदार अनिल बाबर म्हणाले की, शिवप्रताप ॲग्रोमॉल आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व आधुनिक मशिनरी तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. प्रतापराव साळुंखे यांनी शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचे दालन खुले करून दिले आहे.

प्रतापराव साळुंखे म्हणाले की, शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल हा देशातील पहिला मॉल आहे जो एकाच छताखाली सर्व शेतीचे साहित्य विक्री करतो. मॉलमध्ये सात हजार पेक्षा जास्त वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. विळी, खुरपी खोरे-कुदळी ते पेरणी, काढणे - मळणी पर्यंत सर्व मशिनरी त्याचबरोबर ठिबक इलेक्ट्रिक मोटर, पाइपलाइन, खते बी-बियाणे, औषधे, शेडनेट मल्चिंग पेपरसह इतर पॅकिंग साहित्य त्याचबरोबर जनावरांच्या सर्व साहित्य उपलब्ध आहे.

विठ्ठलराव साळुंखे म्हणाले की, शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल हा शिवप्रताप शेतकरी उत्पादक कंपनीचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.  शिवप्रतापचा नावलौकिक शेतकऱ्यांची सेवा करून अधिक उंचावर नेऊ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com