शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे : अमानकर

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे : अमानकर
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे : अमानकर

अकोला : सध्याच्या काळात रेशीम शेती फायद्याची आहे. त्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थ‍िक उन्नतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे, असा सल्ला रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी दिला.

‘रोजगारक्षम शेती व्यवसाय’ या सदराखाली शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. १९) साप्ताहिक मुक्त कार्यशाळा झाली. या वेळी ते ‘रेशीम शेती व उद्योग’ या विषयावर बोलत होते. रेशीम विकास अधिकारी एस. एस. शिंदे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके, रेशीम विभागाचे क्षेत्र सहायक ए. यू. मानकर, प्रकल्प अधिकारी विजय ठाकरे उपस्थित होते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमांतर्गत तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन योजनेंतर्गत पावसाळी हंगाम तुती लागवडीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी चालू आहे. इच्छुकांनी जिल्हा रेशीम कार्यालयात २९ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यासाठी २०१९-२० साठी तीनशे एकर तुती लागवडीचा लक्षांक आहे. यासाठी अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत. शासनाकडून केंद्रीय रेशीम विभागाच्या सिल्क समग्र योजनेद्वारे अनुदान मिळते.   जिल्ह्यातील रेशीम शेती व शेतीपूरक रेशीम उद्योगाबाबत प्रगतिशील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत संवाद साधला. अंबाशी येथील देवराव लाहोळे यांनी रेशीम शेतीद्वारे महिन्याकाठी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले. पांगरताठी येथील शंकर जाधव यांनी वॉटरकप स्पर्धेतील १८ लाख रुपयांचे बक्षीस रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणून खर्च केला. पांडुरंग गिऱ्हे (अालेगाव) यांनी रेशीम रोप, कोष व चॉकी (लहान अळीची अवस्था) आदींची विक्री करून नऊ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com