शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर करावा ः डॉ. अशोक कुमार सिंग

पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे. यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी व सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल करून डिजिटल व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करून शेतकऱ्यांना आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी शास्त्रज्ञांनी कामाची गती वाढवावी लागेल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. अशोक कुमार सिंग यांनी व्यक्त केले.
Farmers should use digital platform: Dr. Ashok Kumar Singh
Farmers should use digital platform: Dr. Ashok Kumar Singh

पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे. यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी व सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल करून डिजिटल व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करून शेतकऱ्यांना आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी शास्त्रज्ञांनी कामाची गती वाढवावी लागेल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. अशोक कुमार सिंग यांनी व्यक्त केले.  

कृषी तंत्रज्ञान अवलोकन संशोधन संस्थेच्या (अटारी) वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ५१ कृषी विज्ञान केंद्रांची राज्यस्तरीय ऑनलाइन वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा २७ व २८ मे रोजी झाली. ही कार्यशाळा अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

या कार्यशाळेसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे कृषी विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. अशोक कुमार सिंग, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, जोधपूर येथील अटारीचे संचालक डॉ. एस. के. सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस आर गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवसरकार, अटारी पुणे शास्रज्ञ डॉ. अमोल भालेराव, डॉ. अंकुश कांबळे आणि ५१ कृषी विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ शास्रज्ञ ऑनलाइन उपस्थित होते.

श्री. सिंग म्हणाले की, आगामी खरीप हंगामाबरोबर शेतीवर आधारित असेलेल दुय्यम व्यवसाय, फुलशेती, दुग्धव्यवसाय, एकात्मिक शेती पद्धती मॉडेल, विपणन प्रणाली आणि मागणी व पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे. केव्हीकेच्या तज्ज्ञांनी मल्टी-टास्कर आणि सर्व विषयांचे ज्ञान आत्मसात  करावे. तसेच घरगुती पातळीवर विविध भाजीपाला व अन्न-धान्य साठवणूक व्यवस्था निर्मिती विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रत्येक केव्हीकेनी आदर्श मॉडेल गाव विकसित करावे. तसेच हवामानातील होणाऱ्या बदलानुसार परिस्थितीबाबत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित माहिती प्रसारित करावी. भारतातील विस्थापित होणाऱ्या प्रवासी कामगारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षणाचे नियोजन करावे.

अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग म्हणाले की, कोविड-१९ संकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आकस्मिक नियोजन करावे. शेती चाचण्या आणि आद्य रेषा प्रात्यक्षिकामार्फत अंतर्गत कृषी विद्यापीठे आणि आयसीएआर संस्थांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणांचा अंतर्भाव, लागवडी पद्धती आणि तंत्रज्ञान विषयीचा प्रसार करण्यावर भर द्यावा. कार्यक्रमाचे राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. तर अटारी पुणेचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. अंकुश कांबळे यांनी आभार मानले.

आपआपल्या परिसरातील शेतीच्या विशिष्ट समस्या विचारात घेऊन नियोजन करण्यावर भर द्यावा. खरिपाच्या नियोजनासाठी माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, शेतमाल प्रतवारी, साठवणूक व विपणन व्यवस्थेविषयी मार्गदर्शन करणे आणि लागवडीच्या खर्चात कपात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचे व्हिडिओ क्लिप्स तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात यावे.  - डॉ. के. पी. विश्वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com