शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे ः पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे मागे घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी एकमेकांशी चर्चा करून, एकमेकांना विश्‍वासात घेऊन आता आंदोलन मागे घेण्यासंदर्भाने विचार केला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
Farmers should withdraw agitation: Pawar
Farmers should withdraw agitation: Pawar

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे मागे घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी एकमेकांशी चर्चा करून, एकमेकांना विश्‍वासात घेऊन आता आंदोलन मागे घेण्यासंदर्भाने विचार केला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी (ता. १९) ते बोलत होते.  पवार म्हणाले, केंद्र सरकारने कृषी सुधारणा या नावाखाली तीन कृषी कायदे प्रस्तावित केले होते. परंतु देशभरातील शेतकऱ्यांनी या सुधारणा नाकारत हे कृषी कायदे मागे घेण्यात यावे याकरिता दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून आंदोलन चालविले आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस याची देखील पर्वा शेतकऱ्यांनी केली नाही. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा परिणाम म्हणूनच हे कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी लागली. त्यामुळे आता शेतकरीदेखील आपले आंदोलन मागे घेण्यासंदर्भाने सामूहिक विचारांती निर्णय घेतला पाहिजे. केंद्रातील भाजप नेते महाराष्ट्रासारखे प्रगतिशील राज्य हातातून दिल्यामुळे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्याच्याच परिणामी सरकार स्थापनेपासूनच ज्योतिषाप्रमाणे हे सरकार तीन महिन्यांत कोसळेल, दोन महिन्यांत कोसळेल, पाच महिन्यांत कोसळेल, अशा प्रकारची भविष्यवाणी सातत्याने करण्यात आली. मात्र महाविकास आघाडी सरकारने यशस्वीपणे आज दोन वर्षे पूर्ण केली आहेत. त्यातूनच भाजप नेत्यांची अस्वस्थता प्रचंड ताणली गेली. काही सुचत नसल्याने केंद्राच्या अखत्यारित असलेल्या तपास यंत्रणांचा प्रचंड गैरवापर सुरू करण्यात आला. महाविकास आघाडीतील नेत्यांची नाहक चौकशी करून त्यांच्यावर छापे टाकण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com