agriculture news in marathi, farmers shows black flag to Minister Sadabhau Khot | Agrowon

सदाभाऊंना मानोऱ्यातही दाखवले काळे झेंडे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

वाशीम : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत सोलापूरमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती मंगळवारी (ता. 27) वाशीम जिल्हा दौऱ्यातही बघायला मिळाली. त्यांची वाहने मानोरा शहरातून जात असताना शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.

वाशीम : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत सोलापूरमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती मंगळवारी (ता. 27) वाशीम जिल्हा दौऱ्यातही बघायला मिळाली. त्यांची वाहने मानोरा शहरातून जात असताना शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेतील कलगीतुऱ्याचे पडसाद विदर्भातही उमटले. मानोरा येथे काही शेतकऱ्यांनी खोत यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर येत काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या. कृषी राज्यमंत्री खोत हे मंगळवारी वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे अायोजित शेतकरी मेळाव्यानिमित्त त्यांचा दौरा होता. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली. मानोरा येथील शिवाजी चौकात राज्यमंत्री खोत यांचा वाहनाचा ताफा आला असता शेतकरी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करीत घोषणा दिल्या.

स्वाभिमानीचे कार्यकते नजरकैदेत --
सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक करून, गाजर दाखवण्यात अाले होते. त्यानंतर स्वाभिमानी व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट वाद उफाळून अाला. या घटनेचे पडसाद पाहता खोत यांच्या वाशीम दौऱ्यात पोलिसांनी अाधीच खबरदारी घेतली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह कार्यकर्त्यांना मंगळवारी सकाळीच मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात नजर कैदेत ठेवण्यात आले होते. मानोरा येथे शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवल्याचा दावा इंगोले यांनी केला.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...