सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करा ः माने

सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करावे.
Farmers in Solapur apply for Agricultural Mechanization Scheme: Mane
Farmers in Solapur apply for Agricultural Mechanization Scheme: Mane

सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले.

या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टर चलित औजारे जसे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र, फवारणी यंत्र, पॉवर टिलर, वीडर, रिपर, कापणी यंत्र खरेदी करायचे असतील, अशा शेतकऱ्यांनी शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. 

जिल्ह्यातील कोणत्याही महा-इ सेवा केंद्रामध्ये शेतकरी अर्ज भरु शकतील. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत, ते सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी नव्याने ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करायचे आहेत. लाभार्थी निवड लकी ड्रॉ सोडत पद्धतीने होणार आहे. एखाद्या घटकाचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला असेल, तर पुढील १० वर्ष त्या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाही. मात्र, इतर घटकासाठी शेतकरी अर्ज करू शकतील, असेही माने यांनी सांगितले.

ही कागदपत्रे लागणार

ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांकडे सात-बारा, आठ-अ चा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबुक, ट्रॅक्‍टर आरसी बुक, असल्यास जातीचा दाखला, आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल ही कागदपत्रे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com