सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ मिळणार

सोलापूर : हवामान अधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे.
Benefit of Fruit Crop Insurance
Benefit of Fruit Crop Insurance

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान अधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. रिलायन्य जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला यासंबंधी कळवले असून, त्यानुसार सुमारे १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना १८ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपये फळपीक विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.  शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही रक्कम मिळण्याबाबात आम्ही पाठपुरावा करत आहोत, शेतकऱ्यांनी अर्जभरतेवेळी दिलेल्या त्यांच्या संबंधित बँक खात्यावर ही रक्कम जमा होईल, असेही शिंदे म्हणाले.

तालुकानिहाय शेतकरी आणि कंसात मिळणारी भरपाई अशी  अक्कलकोट- १८ (२ लाख ६२ हजार रुपये), बार्शी- १०७ (१५ लाख ५ हजार रुपये), करमाळा- ६५ (१० लाख ४९ हजार रुपये), माढा- ७९ (१० लाख ४४ हजार रुपये), माळशिरस- ६०४ (७७ लाख ३८ हजार रुपये), मंगळवेढा- ४३५० (चार कोटी ६० लाख ७५ हजार रुपये), मोहोळ -२९ (एक लाख ६० हजार रुपये), पंढरपूर- ६१० (६१ लाख ४ हजार रुपये), सांगोला -१० हजार ९८५ (१२ कोटी ५६ लाख सहा हजार रुपये), दक्षिण सोलापूर- २१ (२ लाख ४३ हजार रुपये).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com