agriculture news in marathi Farmers from Solapur District to get Crop insurance | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ मिळणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 नोव्हेंबर 2021

सोलापूर : हवामान अधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे. 

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान अधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहर २०२१ साठी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये फळपिक विमा भरलेल्या १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. रिलायन्य जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला यासंबंधी कळवले असून, त्यानुसार सुमारे १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना १८ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपये फळपीक विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. 
शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही रक्कम मिळण्याबाबात आम्ही पाठपुरावा करत आहोत, शेतकऱ्यांनी अर्जभरतेवेळी दिलेल्या त्यांच्या संबंधित बँक खात्यावर ही रक्कम जमा होईल, असेही शिंदे म्हणाले.

तालुकानिहाय शेतकरी आणि कंसात मिळणारी भरपाई अशी 
अक्कलकोट- १८ (२ लाख ६२ हजार रुपये), बार्शी- १०७ (१५ लाख ५ हजार रुपये), करमाळा- ६५ (१० लाख ४९ हजार रुपये), माढा- ७९ (१० लाख ४४ हजार रुपये), माळशिरस- ६०४ (७७ लाख ३८ हजार रुपये), मंगळवेढा- ४३५० (चार कोटी ६० लाख ७५ हजार रुपये), मोहोळ -२९ (एक लाख ६० हजार रुपये), पंढरपूर- ६१० (६१ लाख ४ हजार रुपये), सांगोला -१० हजार ९८५ (१२ कोटी ५६ लाख सहा हजार रुपये), दक्षिण सोलापूर- २१ (२ लाख ४३ हजार रुपये).


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...