agriculture news in marathi, farmers start preparation for pola festival, pune, maharashtra | Agrowon

मावळात बैलपोळ्यानिमित्त चवरे खरेदीची लगबग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

टाकवे बुद्रुक, जि. पुणे  : बळिराजाच्या हौशेचा सण अर्थात बैलपोळा हा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त परंपरेने बैलांच्या शिंगावर पळसाची चवरे बांधण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्या चवरांची विक्री सध्या गावोगावी होत असून, ती विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. 

टाकवे बुद्रुक, जि. पुणे  : बळिराजाच्या हौशेचा सण अर्थात बैलपोळा हा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त परंपरेने बैलांच्या शिंगावर पळसाची चवरे बांधण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्या चवरांची विक्री सध्या गावोगावी होत असून, ती विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. 

मावळ तालुक्‍यात शनिवारी (ता. २८) भाद्रपद पोळा साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठा बैल सजावटीच्या वस्तूंनी सजल्या आहेत. याशिवाय आंदर मावळातील सटवाईवाडी, कुसवली, कांब्रे पठार, कळकराईतील चवरे गुंफणारे कारागीर विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. नायलॉनच्या चवरांपेक्षा पळसाच्या चवरांना अधिक मागणी असते. पळसाच्या मुळ्या कुटून त्यापासून ही चवरे तयार केली जातात, ही चवरे गुंफणारे मोजकेच कारागीर आहेत. शंभर ते एकशे वीस रुपये प्रतिनग याप्रमाणे चवरे विक्री करीत असल्याचे, सटवाईवाडीतील कारागीर विष्णू हेमाडे यांनी सांगितले. वडेश्‍वर, माऊ, दवणेवाडी, टाकवे बुद्रुक, फळणे, कान्हे या गावांसह वडगाव मावळ, कामशेत, तळेगाव दाभाडे, लोणावळ्याच्या बाजारपेठेत ही चवरे विक्रीसाठी उपलब्ध आहे.


इतर ताज्या घडामोडी
काटेवाडीत होणार पहिला व्यावसायिक मुरघास...पुणे  ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा...
ऊस वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा ः...पुणे ः चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील साखर...
नांदेड : रब्बीच्या पेरणीने सर्वसाधारण...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात बुधवार (ता. ११) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात प्रतिकूल हवामानाचा तूर...सांगली  : जिल्ह्यात पोषक हवामानाअभावी तूर...
तीन जिल्ह्यांत मुगाचे दोन कोटी ४० लाख ...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
बारदान्याअभावी वाढल्या धान...भंडारा ः धान उत्पादकांसमोरील अडचणी संपता संपत...
नक्षलग्रस्त जिल्हे पाणीपट्टी सवलतीतून...गोंदिया  ः नक्षलग्रस्त भाग, तसेच पंतप्रधान...
कोल्हापुरात पुष्पप्रदर्शनाला मोठा...कोल्हापूर : स्वागत कमानीपासूनच विविध प्रकारच्या...
घोडेगाव उपबाजारात नव्या कांद्याला ११...सोनई, जि. नगर  : नेवासे बाजार समितीच्या...
फडणवीस सरकारच्या शिवस्मारकाच्या निविदा...नागपूर : मुंबईतील बहुचर्चित शिवस्मारकाच्या...
अवकाळीग्रस्तांना हेक्टरी २५ हजारांची...नागपूर : ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...
गुलटेकडीत बटाटा, फ्लॉवर, शेवग्याच्या...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...
हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई  ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...
गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे  ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...
लाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक  : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...
ठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...
ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...
तनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : "डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...