मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
...येथे कांदा रोपे राखणीसाठी शेतकऱ्यांचा मुक्काम शेतात !
शेतातूनच रोपे चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रोपांच्या राखणीसाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली असून, अनेक शेतकरी थेट रात्रीचा मुक्काम शेतातच करत आहेत.
विसापूर, जि. सातारा : सोन्याचे दाग-दागिने, रोकड रक्कम, महागड्या वस्तू अशा चोरीच्या घटना नेहमीच ऐकण्यात येतात. पण, आता चक्क चोरांनी आपला मोर्चा कांद्याच्या रोपांकडे वळवला आहे. कांद्याच्या रोपांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतातूनच रोपे चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रोपांच्या राखणीसाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली असून, अनेक शेतकरी थेट रात्रीचा मुक्काम शेतातच करत आहेत.
यंदा पुसेगावसह परिसरात अतिपाऊस, खराब हवामानामुळे कांदा रोपे खराब झाली. तर अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे तयार कांदा रोपाला प्रचंड मागणी असून, त्याच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. त्यातच, १५ दिवसांपूर्वी पुसेगाव परिसरात कांद्याची रोपे चोरीला जाण्याच्या दोन घटना घडल्या. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे शेतात येऊन रोपे उपटून नेत असल्याने या रोपांच्या राखणीसाठी कडाक्याची थंडी असूनदेखील शेतकऱ्यांना शेतातच मुक्काम करावा लागत आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे रात्रीचे शेतात झोपताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच जंगली जनावरे तथा विषारी साप, विंचू आदी प्राण्यांपासून देखील धोका आहे. मात्र, तरीही अतिकष्टातून तयार केलेल्या कांद्याच्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी नाइलाजास्तव शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून रात्रीचा मुक्काम उघड्यावर शेतातच करावा लागत आहे.
- 1 of 657
- ››