कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
ताज्या घडामोडी
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर मुक्काम सत्याग्रह
पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी अखिल भारतीय किसान सभेने पुण्यातील दी ओरिंएटल इन्शुरन्श कंपनीच्या कार्यालयासमोर मुक्काम सत्याग्रह बुधवारी (ता. १३) सुरू केला आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा कमिटी सदस्य अॅड. अजय बुऱ्हाडे, विष्णूपंत देशमुख, सुदाम शिंदे, प्रवीण देशमुख, सखाराम चिंधे, शरदकुमार महाजन, ज्ञानेश्वर मोटे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.

या वेळी अॅड. अजय बुऱ्हाडे म्हणाले, ‘‘परळी तालुक्यातील २०१८ च्या खरीप विम्यापासून २००-३०० शेतकरी वंचित आहेत. सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह मुदतीच्या आत पीकविम्याचे प्रस्ताव आॅनलाइन पद्धतीने आपल्या पीकविमा कंपनीकडे सादर केले होते. सोयाबीनसह इतर पिकांना विमा मंजूर होऊन काही शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा झाला. पण ज्यांना पीकविमा रक्कम मिळाली नाही, त्यासंदर्भात कंपनीककडून शासकीय पोर्टलवर चुकीचा आयएफएससी कोड भरल्यामुळे, चुकीचा बॅंक खाते क्रमांक, सात बारावरील जमिनीपेक्षा जास्तीचा विमा घेतल्यामुळे, सात बारावरील जमिनीचा एकापेक्षा जास्त वेळा विमा घेतल्यामुळे रक्कम देण्यात आलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांनी कुणीही सातबारावरील जमिनीपेक्षा जास्त क्षेत्राचा व सात बारावरील जमिनीचा एकापेक्षा जास्त विमा घेतलेला नाही. संगणक आॅपरेटरच्या नजरचुकीमुळे चुकीचा आयएफएससी कोड, चुकीचा बॅंक खाते क्रमांक, पिकांसमोरील क्षेत्राच्या रकाण्यात सर्व गट नंबरची नोंद न करता एकच गट नंबर नोंदवणे, अज्ञान खातेदारांसाठी पालकांचा बँक खाते नंबर देणे, यांसारख्या व इतर कारणामुळे पीकविमा मिळू शकलेला नाही.
आम्ही सर्व शेतकऱ्यांनी १६ सप्टेंबर २०१९ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा पावती, आधार कार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स, सात बारा आठ अ या कागदपत्रासह अर्ज सादर केले आहेत. त्याची रितसर पोहच आमच्याकडे आहे. दीड महिना लोटला तरी आत्तापर्यंत हक्काचा पीकविमा मिळू शकलेला नाही. अगोदर अवर्षण अन् आता अवकाळी पाऊस या दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दप्तर दिरंगाईत अडकवून आमच्या संयमाचा अंत पाहणे थांबवावे. लवकरात लवकर पीक विम्याची नुकसान भरपाई द्यावी, यासाठी हे मुक्काम सत्याग्रह सुरू केले आहे.
- 1 of 586
- ››