विनाअट कर्जमुक्तीसाठी परभणीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

विनाअट कर्जमुक्तीसाठी परभणीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
विनाअट कर्जमुक्तीसाठी परभणीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

परभणी : ‘शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी खडकवाडी (ता. मानवत) येथील शेतकऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या धरणे आंदोलनाकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्यावी’, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीतर्फे मंगळवारी (ता. १०) सकाळी साडेअकरा वाजता परभणी- गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाला पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सरकराच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे खडकवाडी येथील शेतकऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. खडकवाडी येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील अन्य गावातील शेतकरीदेखील आंदोलन करत आहेत. त्याकडे शासन तसेच प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. जाचक अटींमुळे असंख्य शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे विनाअट कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन झाले. 

समितीचे कॅा. विलास बाबर, किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ, राजाभाऊ राठोड, रामराव गव्हाणे, के. बी.शिंदे, विष्णु मोगले, मुंजा ईखे, उस्मान पठाण, कल्याण लोहट, मुंज लोडे, शेख जाफर, के. बी. बदाले, शेख महेबुब आदीसह कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com