agriculture news in marathi, Farmers stopped purchasing sedan pigeon | Agrowon

शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

यवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी दराने तुरीची खरेदी होत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खरेदी बंद पाडली. त्यानंतर सभापतींच्या कक्षात ठिय्या देत याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली.

यवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी दराने तुरीची खरेदी होत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खरेदी बंद पाडली. त्यानंतर सभापतींच्या कक्षात ठिय्या देत याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली.

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाल्यास कारवाईचा इशारा सरकारकडून देण्यात आला होता. सध्या तुरीचा हमीभाव ५,६७५ रुपये जाहीर करण्यात आला आहे. खासगी बाजारात मात्र तुरीची यापेक्षा कमी दराने खरेदी होत असताना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सरकार अद्यापही तयार नाही. त्यातच गेल्यावर्षीचे कमिशन न दिल्यामुळे खरेदी विक्री संघांनी शासकीय खरेदीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. ही संधी साधून येथील बाजार समितीत व्यापाऱ्यांनी तुरीचे दर पाडले. 

दोन दिवसांपूर्वी यवतमाळ बाजार समितीत ५,४०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने तुरीची खरेदी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी (ता. २१) पाच हजारांपेक्षा अधिकचा दर देण्यात आला. सायंकाळपर्यंत हे दर ४६०० ते ४९०० पर्यंत व्यापाऱ्यांनी खाली आणले. खरेदीचे दर हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपयांच्या तुटीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलन सुरू केले.

बाजारात खरेदी बंद पाडण्यात आली. त्यानंतर सभापती रवींद्र ढोक यांच्या कक्षात शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहता ढोक यांनी तहसीलदार, जिल्हा निबंधकांना पाचारण केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा निर्णय झाल्यानंतर तणाव निवळला.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...