पोलिसांच्या अडणुकीचा शेतीमाल विक्रीला फटका

लॉकडाऊन सुरू झाल्यावर सुरुवातीला शेतमाल विक्रीसाठी अडचणी येत नव्हत्या. मात्र, पुणे शहरातील काही पेठांमध्ये कोरोनामुळे रेडझोनमध्ये गेल्यामुळे जसजसा लॉकडाऊन वाढत गेला तसतशी पोलिसांकडून अडवणूक सुरू झाली. आता ग्रामीण भागातही कोरोना पोहोचला आहे. आता गावेही सतर्क झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतमाल वाहतुकीच्या गाड्यांची अडवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शेतमालाची विक्री बंद केली आहे. - दादा पवार, अध्यक्ष, श्री. स्वामी समर्थ सेंद्रीय शेती शेतकरी गट, खोपी, ता. भोर.
thet vikri
thet vikri

पुणेः शहरात आणि ग्रामीण भागात पोलिसांकडून शेतमालाच्या गाड्यांची अडवणूक करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी चांगलेच हैराण झाले आहेत. त्यामुळे  सव्वा महिन्यापासून सुरू करण्यात आलेली थेट भाजीपाला, फळांची विक्री  १७ हून अधिक शेतकरी कंपन्या, शेतकरी गटांकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना भाजीपाला मिळेनासा झाला असून येत्या काळात ग्राहकांना शेतमालाची चांगलीच टंचाई भासण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केल्याने गावागावांतील नागरिक सतर्क झाले आहेत. त्यामुळे पोलिस व तहसीलदारांकडून गावाबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करून अडवणूक करण्यात येत आहे. यामुळे गावातून दुसऱ्या गावात जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीलाही बसत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून पुणे शहरांत शेतकऱ्यांनी, शेतकरी गटांनी व कंपन्यांनी विक्री करण्याचे काम थांबवण्यास सुरुवात झाली आहे. त्यापैकी काही शेतकरी गट, कंपन्यांनी विक्री बंद केली आहे.     केंदूर येथील केंद्राई माता शेतकरी कंपनीचे सचिव संदीप सुक्रे म्हणाले की, ‘‘सध्या गावागावांत चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. तेथे पोलिसांकडून पास असतानाही अडवणूक केली जात आहे. शहरातही हीच परिस्थिती असल्यामुळे आम्ही भाजीपाला, फळे विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी फक्त कांद्याची जाग्यावरच गाडी भरून विक्री करत आहे. प्रतिक्रिया शेतकरी गट, कंपन्यांना शेतमाल विक्रीची संधी आहे. सोसायट्यांमध्ये विक्री सुरू ठेऊन कायमस्वरूपी विक्रीची साखळी तयार करण्याची गरज आहे. मात्र, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाची अडवणूक न करण्याच्या सूचना देवूनही काही ठिकाणी अडवणूक केली जात आहे, हे चुकीचे आहे. त्यामुळे गट, कंपन्यांनी लगेच शेतमालाची विक्री करणे बंद करू नये. - विजय कानडे, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, पुणे -------------------- शेतमालाची विक्री बंद केलेले शेतकरी गट, कंपन्या 

  • भामा फार्मर प्रोड्युसर शेतकरी कंपनी, पिंपरी बु, ता. खेड, जि. पुणे
  • केंद्राईमाता फार्मर प्रोड्युसर शेतकरी कंपनी, केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे
  • भामा घोड फार्मर प्रोड्युसर शेतकरी कंपनी, बाभूळसर, ता. शिरूर, जि. पुणे
  • कष्टकरी राजा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, मुखई, ता. शिरूर, जि. पुणे (बंद करण्याच्या तयारीत)
  • फरगडे फार्मर प्रोड्युसर कंपनी, वरवंड, ता. दौंड, जि. पुणे
  • सक्षमी फार्मर प्रोड्युसर कंपनी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे
  • स्फुर्ती ऑरगॅनिक शेतकरी गट, चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे
  • जय हनुमान शेतकरी गट, वरवंड, ता. दौंड, जि. पुणे
  • श्रीनाथ म्हस्कोबा शेतकरी गट, पडवी, ता. दौंड, जि. पुणे
  • पर्यावरणप्रेमी सेंद्रीय शेतकरी गट, आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे
  • स्वामी समर्थ सेंद्रीय शेतकरी गट, खोपी, ता. भोर, जि. पुणे
  • जाणता राजा शेतकरी गट कडेठाण, ता. दौंड, जि. पुणे
  • वेताळबाबा फार्मर प्रोड्युसर कंपनी, काटी, ता. इंदापूर, जि. पुणे
  • प्रगती शेतकरी बचत गट, भरणेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे
  • श्रीनाथ भैरवनाथ शेतकरी गट, बेंडसिंगे, ता. इंदापूर, जि. पुणे
  • शंभूराजे शेतकरी बचत गट, शिवरे, ता. भोर, जि. पुणे
  • जयगणेश कृषी बचत गट, खडकी, ता. भोर, जि. पुण
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com