मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात सुरळीत विजेअभावी शेतकरी हतबल
नांदेड : खरिपात झालेली नुकसानभरपाई रब्बी हंगामात होईल, या आशेवर असलेला शेतकरी वीज मंडळाच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झाला आहे.
नांदेड : खरिपात झालेली नुकसानभरपाई रब्बी हंगामात होईल, या आशेवर असलेला शेतकरी वीज मंडळाच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झाला आहे. कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा करून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार रोहित पवार विचार मंचच्या वतीने देण्यात आला.
यंदा चांगला पाऊस झाल्याने मनार प्रकल्पासह छोटे-मोठे तलाव, विहीरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी जोरात केली आहे. यंदा रब्बीचे पीक चांगले येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. पण, वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे गहू, हरभरा व इतर पिकांना पाणी देता येईल, की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील अनेक ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत. सुरळीत आणि योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने कृषी पंप चालत नसल्याची स्थिती आहे.
गावठाण डिपीसह कृषी पंपांचे रोहित्रं बंद आहेत. याची सूचना शेतकऱ्यांना दिली जात नाही. नादुरुस्त डि.पी. दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. त्यातच शेतीसाठी जाणीवपूर्वक कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे रोहित्रे टिकत नाहीत. विद्यूत वाहिनीवरचा लोड व्यवस्थित राहावा, यासाठी वीज मंडळाने आठ - आठ तासाचे वेळापत्रक तयार केले आहे. तरीही सुरळीत वीजपुरवठा होत नाही.
आठ दिवसांत नायगाव तालुक्यातील नादुरुस्त रोहित्रे दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज वितरण कंपनीच्या उप-कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर मंचचे जिल्हा सचिव गजानन पवार होटाळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुशील पवार, संदीप कल्याण आणि निळकंठ कुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कालव्याचे पाणी वाया
पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मनार कालव्याचे पाणी दरवर्षी वाया जाते. यंदाही तशीच परिस्थिती आहे. मात्र, पाणी वाया गेल्याने भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पण, अधिकारी अपुरे कर्मचारी असल्याचे कारण सांगून वेळ मारुन नेतात. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
- 1 of 1029
- ››