agriculture news in marathi, farmers strike issue to get hot | Page 2 ||| Agrowon

शेतकरी संपाचा मुद्दा तापणार
वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नवी दिल्ली : मंदसौर (मध्य प्रदेश) येथे शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या संपाचा मुद्दा तापविणार आहे. अशी रणनीती शेतकरी संघटनांनी आखली असून, मंदसौरमध्ये राष्ट्रीय किसान महासंघातर्फे शुक्रवारी (ता. ८ ) श्रद्धांजली सभा होणार आहे. यात माजी मंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि विश्‍व हिंदू परिषदेचे माजी सरचिटणीस डॉ. प्रवीण तोगडिया सहभागी होणार आहेत. 

नवी दिल्ली : मंदसौर (मध्य प्रदेश) येथे शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या संपाचा मुद्दा तापविणार आहे. अशी रणनीती शेतकरी संघटनांनी आखली असून, मंदसौरमध्ये राष्ट्रीय किसान महासंघातर्फे शुक्रवारी (ता. ८ ) श्रद्धांजली सभा होणार आहे. यात माजी मंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि विश्‍व हिंदू परिषदेचे माजी सरचिटणीस डॉ. प्रवीण तोगडिया सहभागी होणार आहेत. 

राष्ट्रीय किसान महासंघातर्फे दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतमालाला दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्तीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना सात राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असूनही सरकारकडून अद्याप संवादाचा साधा प्रयत्नही झाला नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. महासंघाचे पदाधिकारी व आंदोलनाचे नेते शिवकुमार कक्काजी यांनी सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी महाराष्ट्रात आंदोलनाचे यशस्वी परिणाम झाल्याचा दावा केला. हरियानातील शेतकरी नेते गुरनामसिंह, उत्तर प्रदेशातील नेते हरपालसिंह, केरळमधील नेते पी. टी. जॉन, संतवीर सिंह आदी उपस्थित होते. 

पाकिस्तानी साखर भेट देणार 
मंदसौरच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस गोळीबारात काही शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेला बुधवारी (ता. ६) एक वर्ष पूर्ण होणार आहे. किसान महासंघातर्फे मंदसौरला ८ जूनला श्रद्धांजली सभा होणार असली, तरी देशाच्या इतर भागांमध्ये आजच श्रद्धांजली कार्यक्रम होईल. आठ जूनला देशभरातील शेतकरी आपापल्या जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांना दूध, फळे, भाज्या भेट देतील. पाकिस्तानातून आयात झालेली साखर भाजप नेत्यांना भेट दिली जाईल. नऊ जूनला शेतकरी उपोषण करणार असून, दहा जूनला ‘भारत बंद’ पुकारला जाणार आहे. १० जूनपर्यंत सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राष्ट्रपतींना भेटून दाद मागितली जाईल आणि १० जूननंतर देशभरात भाजपची शवयात्रा काढली जाईल, असाही इशारा शिवकुमार कक्काजी यांनी दिला.

इतर अॅग्रो विशेष
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...