agriculture news in marathi, farmers struggle to save a crops, pune, maharashtra | Agrowon

‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी धडपड
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका उजनी धरणाकाठच्या शेतकऱ्यांना बसत आहे. धरण शंभर टक्के भरूनही सध्या पाणीपातळी उणे २० टक्‍क्‍यांहूनही खाली गेल्यामुळे उजनीकाठच्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी लढाई सुरू झाली आहे. रोज पाणीसाठा खालावत असल्यामुळे सध्या शेतकरी उजनीकाठावरच तळ ठोकून असल्याचे चित्र भिगवणपासून ते पळसदेवपर्यंत पाहावयास मिळत आहे. 

भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका उजनी धरणाकाठच्या शेतकऱ्यांना बसत आहे. धरण शंभर टक्के भरूनही सध्या पाणीपातळी उणे २० टक्‍क्‍यांहूनही खाली गेल्यामुळे उजनीकाठच्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी लढाई सुरू झाली आहे. रोज पाणीसाठा खालावत असल्यामुळे सध्या शेतकरी उजनीकाठावरच तळ ठोकून असल्याचे चित्र भिगवणपासून ते पळसदेवपर्यंत पाहावयास मिळत आहे. 

चालू वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. धरणांमध्ये सुमारे ११७ टीएमसी पाणीसाठा झाला होता; परंतु एप्रिल महिन्यामध्ये धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. सध्या उजनी धरणांमध्ये उणे २० टक्‍क्‍यांहूनही कमी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली हजारो एकर क्षेत्रातील पिके अडचणीत आली आहेत. पाण्याअभावी जळून चाललेली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सध्या दौंड तालुक्‍यातील राजेगाव, खानोटा येथे पाणी काही दिवसांत संपण्याची चिन्हे आहेत; तर इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, तक्रारवाडी, कुंभारगाव, डाळज, पळसदेव येथे पाणी नदीपात्रात पोचले आहे.

सतत खाली जाणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रोजच पाइप वाढवावे लागत आहेत. विजेचा लपंडाव, खालावलेली पाणीपातळी, पाण्याअभावी करपणारी पिके व चिंताग्रस्त शेतकरी अशी अवस्था सध्या उजनीकाठच्या शेतकऱ्यांची आहे. आणखी एक महिना पिके कशी वाचवायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. केवळ शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दौंड, इंदापूर, करमाळा व कर्जत तालुक्‍यांतील पिके धोक्‍यात आली आहेत. ज्याप्रमाणे दुष्काळी भागातील पिकांचे पंचनामे केले जातात त्याचप्रमाणे नदीकाठच्या पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांचेही पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.

याबाबत बळिराजा शेतकरी संघाचे प्रदेश संघटक अनिल खोत म्हणाले, की उजनी धरणासाठी इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी त्यांच्या सुपीक जमिनींचा त्याग केला आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी नऊ टीएमसी पाणी राखीव आहे. प्रकल्पातील पाणी देताना प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांचा विचार होण्याची आवश्‍यकता आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे इंदापूर तालुक्‍यातील हजारो एकरातील पिके धोक्‍यात आली आहेत. हा शासननिर्मित दुष्काळ असून, शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सरकारने नुकसानभरपाई द्यावी.  

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...