agriculture news in marathi Farmers struggle to save vineyards in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे अगोदरच द्राक्ष उत्पादक संकटात सापडला होता. त्यातच कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले.

सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे अगोदरच द्राक्ष उत्पादक संकटात सापडला होता. त्यातच कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदा पुढील हंगामाच्या तयारीला लागला. तोच गेल्या पंधरा दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा दणका बसला. त्यामुळे द्राक्ष बागा वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. 

सध्या निर्यातीपेक्षा शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात बागा वाचवू मग द्राक्ष निर्यातीचा विचार करु, अशी भूमिका शेतकऱ्यांनी केली आहे. परंतू, द्राक्षाचे उत्पादन आणि दर्जा  टिकवण्यासाठी जिद्दीने लढा सुरु आहे. गेल्यावर्षी महापूर, अतिवष्टी या साऱ्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातूनही मोठ्या जिद्दीने द्राक्ष बागा वाचविल्या होत्या. परंतु, बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाच्या उत्पादनाला फटका बसला. दर्जाही घसरला. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतले.

द्राक्षाला दरही अपेक्षित मिळू लागला. मात्र, ऐन हंगामात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बाजारपेठा बंद झाल्या. त्यातही शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री केली. 
कोरोना आणि अतिपावसाने फळ छाटणी उशीरा सुरु झाली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला.

अगोदरच हंगामाला उशीरा प्रारंभ झाला. त्यात अतिवृष्टी सुरु झाली. त्यामुळे पोंगा, फुलोरा अवस्थेत असलेल्या बागांना जोरदार फटका बसला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...