Agriculture news in Marathi Farmers struggling due to falling prices of summer onions | Agrowon

उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची कोंडी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

लाल कांद्याची आवक दबावात असताना उन्हाळी कांद्याची आवक कमी असल्याने दरवाढीची अपेक्षा होती. मात्र असे असताना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अखेरीस क्विंटलमागे ७०० ते १००० हजार रुपये घसरण झाल्याने दराने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. 

नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून साठा सांगतेकडे आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामात दराचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन केले. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नसलेला उठाव, निर्यात प्रक्रियेत धरसोडीच्या धोरणामुळे अस्थिर निर्यात प्रक्रिया त्यामुळे दरामुळे अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आता वातावरणीय बदलांमुळे सड होऊन वजनात घट आली आहे. त्यातच लाल कांद्याची आवक दबावात असताना उन्हाळी कांद्याची आवक कमी असल्याने दरवाढीची अपेक्षा होती. मात्र असे असताना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अखेरीस क्विंटलमागे ७०० ते १००० हजार रुपये घसरण झाल्याने दराने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. 

एप्रिलमध्ये नवी उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर विक्रमी आवक झाली. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मे महिन्यात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून बाजार समित्या जवळपास दोन आठवडे बंद राहिल्याने कामकाज अडचणीत सापडले. मे महिन्यानंतर ते सुरळीत झाले. जुलै ते सप्टेंबरपर्यंत दरात चढ-उतार होते. तुलनेत ऑक्टोबरमध्ये मागणी वाढून दरात सुधारणा दिसून आली. दिवाळीनंतर बाजारात उठाव होऊन बाजार पुन्हा वधारले. मात्र आवकेत पुन्हा काही अंशी वाढ झाल्याने व मागणी पुन्हा मंदावल्याने दरात घसरण झाली. आता आवक कमी होऊनही दरात फटका बसला आहे. 

चालू वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा रोखून विक्री नियोजन केले. त्यानुसार आवक चांगली होत गेली. मागील वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये पिंपळगाव बाजारात २ लाख १३ हजार क्विंटल आवक होऊन नोव्हेंबर महिन्यात सरासरी ३,७५५ दर मिळाला होता. तर चालू वर्षी २ लाख ३१ हजार क्विंटल आवक होऊन २,१८५ रुपयांचा सरासरी दर मिळाला. मंगळवारी (ता. ३०) हे दर १,५२१ रुपयांपर्यंत तर अनेक बाजार समित्यांमध्ये महिनाअखेर हे दर १२०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे मर्यादित आवक होत असताना उत्पादन, साठवणूक असा खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

उन्हाळी कांद्याच्या सरासरी दराची स्थिती 
बाजार समिती जुलै ऑगस्ट  सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 
पिंपळगाव बसवंत १,६८५ १,५८१ १,६८० ३,२०१ २१८५ 
लासलगाव १,६९९ १,६८५ १,९०१ ३,०५१ २,०४७ 
उमराणे १,६५० १,७०० १,५०० ३,००० १,८५० 
नामपूर १,७०० १,५०० १,४५० ३,१०० १,८०० 
चांदवड १,६४० १,५८० १,६५० २,९४० २,१३५ 
येवला १,५६५ १,५०० १,६५० २,७०० १,५०० 
सिन्नर १,६४३ १,५८८ १,६४६ २,८५९ २,००५ 
सटाणा १,६७५ १,४०० २,३५० २,४०० १,३७५ 
कळवण १,७०० १,६०० १,५०० ३,५०० १,८०० 

उन्हाळी कांद्याच्या दरात मागणीनुसार चढ-उतार आहे. त्यात सध्या प्रतवारीवर परिणाम असल्याने दर त्यानुसार निघत आहेत. 
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड 

देशावर मागणी कमी व निर्यात प्रक्रियेत धरसोडीच्या निर्णयामुळे अपेक्षित उठाव शकला नाही. त्यामुळे साठवणूक करून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. उन्हाळी अंतिम टप्प्यात असताना त्यात लाल कांद्याची अपेक्षित आवक नसताना शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळू शकलेले नाहीत. 
- पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण
 


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...