पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी दरात विकली ! देवगावच्या शेतकऱ्याचा प्रेरणादायी अनुभव

पैठण तालुक्यातील देवगाव येथील विक्रम पंडितराव कोठुळे यांनी पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी दरात काही वेळातच विकली. पहिल्या दिवशी ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आमच्याकडील उत्तम दर्जाची मोसंबी आता सहज विकली जाईल याची खात्री आली
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी दरात विकली ! देवगावच्या शेतकऱ्याचा प्रेरणादायी अनुभव
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी दरात विकली ! देवगावच्या शेतकऱ्याचा प्रेरणादायी अनुभव

औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही, नंतर 'लॉकडाऊन' मूळ कुणी आमच्या मोसंबीला घ्यायला येईना. काय करावं काही सुचेना 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीचा पर्याय पुढे आला अन् पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी दरात काही वेळातच विकली गेली. पहिल्या दिवशी ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आमच्याकडील उत्तम दर्जाची मोसंबी आता सहज विकली जाईल याची खात्री आली अन् होणार नुकसान काही प्रमाणात का होईना टळल्याने अवसानही आलं.

पैठण तालुक्यातील देवगाव येथील विक्रम पंडितराव कोठुळे यांनी आपली भावना व्यक्त केली. श्री कोठुळे म्हणाले, आमच्याकडे जवळपास तीस गुंठे क्षेत्रावर मोसंबी बाग आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे आंबे बहराचे व्यवस्थापन करता आले नाही. त्यामुळे वरच्या पावसाच्या भरवशावर जो मृगबहार पकडला गेला त्यावरच शेतीचे अर्थकारण अवलंबून होता. महिना दीड महिन्यापूर्वी बागवानाने बाग मागितली होती, परंतु त्यावेळी सौदा झाला नाही. नंतर कोरोना प्रादुर्भावाचा संकटामुळे लॉकडाऊन झाले महिनाभरापासून आमच्या मोसंबीला कुणी घ्यायला तयार होत नव्हते. मागितली तर अगदी कवडीमोल दराने बाग मागितली जात होती. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा मोसंबी पीक हातच जाईल अशी स्थिती निर्माण झाली.

या दरम्यान, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पर्याय पुढे आला ‘जय जवान, जय किसान शेतकरी मंडळा’च्या माध्यमातून दीपक जोशी यांचं मार्गदर्शन मिळालं. अन् आम्ही मोसंबीची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पहिल्यांदाच ग्राहक कसा प्रतिसाद देतात म्हणून पंचवीस रुपये प्रति किलोने विक्रीसाठी २६० किलो मोसंबी प्रत्येकी पाच किलोच्या पॅकिंग मध्ये पॅक केली. त्यासाठी मोसंबीची आगाऊ नोंदणी ग्राहकाकडून करून घेतली होती. काही तासातच मोसंबी विकल्या गेली तर काही ग्राहकांची मागणी पहिल्याच फेरीत पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मागणी आहे आपण थेट विक्रीचा पर्याय यशस्वी करू शकतो याची खात्री आली. आता थेट ग्राहकांकडून मागणी नोंदवून त्यांना कमी हाताळणी व उच्च दर्जाची मोसंबी घरपोच पुरवठा करण्याचा मी ठरवले. या प्रयत्नामुळे आमचा विक्रीचा प्रश्न सुटतोय सोबतच ग्राहकांनाही वाजवी दरात चांगल्या दर्जाची मोसंबी व इतर फळे व भाजीपाला मिळण्याची गरज पूर्ण होते आहे. ....... ४९ हजार ८२७ किलो फळे भाजीपाला विक्री २९ मार्च पासून औरंगाबाद शहरात शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री उपक्रमांतर्गत शुक्रवारपर्यंत(ता ३) ४९ हजार ८२७ किलो फळे व भाजीपाल्याची विक्री शेतकरी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली आहे यामध्ये २३ हजार ६४५ किलो भाजीपाला तर २६ हजार १८२ किलो फळांचा समावेश आहे कृषी विभाग सहकार विभाग जिल्हा प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभाग पोलीस यांचे शेतकऱ्यांना सहकार्य मिळते आहे. शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून शेतकरी व शेतकरी गट आपल्याकडील फळे भाजीपाला विक्रीचा प्रयत्न करीत आहेत.हे करताना कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व सूचनांचे पालनही केले जाते आहे. .... 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com