शेततळे अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

वडिलांच्या नावावरील ३० बाय ३० आकाराच्या शेततळ्यासाठी ४२ हजार ५०० रुपये अनुदान मिळाले. उर्वरित अनुदान मिळावे, यासाठी वारंवार कृषी कार्यालयाकडे चकरा मारतोय. मागणी केली, या पलीकडे उत्तर मिळत नाही. महिन्यातून एक तरी चक्‍कर कृषी कार्यालयाकडे सुरू आहे. - सदाशिव गिते, शेतकरी, देवगाव, ता. पैठण. शेततळ्यात अस्तरीकरण केले. त्याचे अनुदान रूपात ३४ हजार मिळाले. बाकी अनुदान मिळेल ही आशा आहे. त्याविषयी विचारणा केली, तर बजेट नसल्याचे उत्तर मिळाले. - सुभाष जारे,शेतकरी, अडूळ, ता. पैठण २०१७-१८ मध्ये शेततळ्याचे अस्तरीकरण केले. त्याचे अनुदान म्हणून ४३५०० भेटले, उर्वरित अनुदान मिळेल म्हणून आशा लावून बसलोय. - विठ्ठल निळ,शेतकरी, पोरगाव, ता. पैठण
शेततळे अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या चकरा
शेततळे अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

औरंगाबाद  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाचे बाकी राहिलेले अनुदान मिळावे, यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे चकरा सुरू आहेत. २०१७-१८ मधील आरकेव्हीवाय योजनेअंतर्गत बाकी असलेले हे अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

आरकेव्हीवाय योजनेअंतर्गत मंजूर शेततळे अस्तरीकरणासाठी मिळणाऱ्या अनुदानाची पूर्ण रक्‍कम मिळाली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या तालुका व जिल्हा कार्यालयाकडे वारंवार विचारपूस केल्यानंतरही बजेट नाही, मागणी केली आहे, या पलीकडे ठोस उत्तर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

कृषी विभागाच्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास अडीचशे शेतकऱ्यांच्या अनुदानाचा हा प्रश्‍न आहे. त्यामध्ये पैठणसह वैजापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. २०१७-१८ मध्ये आरकेव्हीवाय योजनेअंतर्गत अनुदानासाठी लागणारी रक्‍कम मिळावी म्हणून कृषी विभागाकडून लेखीही वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले. परंतु होत असलेल्या विलंबामुळे अनुदान मिळेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पैठण तालुक्‍यातील देवगाव, आडूळ, पोरगाव, गेवराई आदी गावांतील जवळपास १८ शेतकरी अनुदान न मिळालेले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com