Agriculture news in marathi Farmers suffer from online method of crop insurance | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन पद्धतीने शेतकरी त्रस्त

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात पिछाडीवर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन मधील त्रुटीने पुरते त्रस्त करून सोडले आहे.

कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात पिछाडीवर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन मधील त्रुटीने पुरते त्रस्त करून सोडले आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे कंपनीशी संपर्क होत नसल्याने शेतकऱ्यांतून मोठी नाराजी आहे. सहन होण्याच्या पलीकडे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धत मानसिक त्रासात भर घालणारी आहे.

रिलायन्स इन्शूरन्स कंपनीला पीकविम्याच्या नुकसान भरपाई बाबतची जबाबदारी दिली आहे. कंपनीचे कार्यालय कोल्हापुरात असले तरी याची कोणतीच माहिती शेतकऱ्यांना नाही, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. अनेक शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त माहिती कशी द्यावी, याची कल्पना नसल्याने संभ्रमावस्था आहे. ७२ तासांत नोंदणी करण्याच्या अटीमुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी २३ जुलैअखेर कोल्हापूर जिल्ह्यात ४५६९ शेतकरऱ्यांनी नोंदणी केली आहे. १४८४ हेक्टर क्षेत्र नोंदणीकृत आहे. त्याची उंबरठा उत्पादन जास्त असल्याने या विम्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होत नाही हा पूर्वानुभव आहे. यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

यंदाही साधारत:  अशीच परिस्थिती होती परंतु अतिवृष्टी व महापुराचा धोका असल्याने यंदा अंतिम टप्यात विमा योजनेत सहभागी घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काहीशी वाढली. पण अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या भरपाईसाठी कशी माहिती द्यायची हीच कल्पना नाही. सध्या मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असल्याने आता या शेतकऱ्यांना संपर्क करून नुकसान नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण ऑनलाइन प्रक्रियेत अडथळा येत असल्याने कंपनीकडून ऑफलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

 या आहेत अडचणी
नुकसानीची नोंदणी टोल फ्री क्रंमांकावर अन्यथा ऑनलाइन करणे हे दोन पर्याय शेतकऱ्यांकडे आहेत. शेतकऱ्यांकडून नुकसानाची नोंदणी टोल फ्री क्रमांकावर तसेच ऑनलाइन करताना ती होतच नाही. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत हा नंबर लागतच नाही. लागलाच तर आपोआप बंद होणे, मध्येच कट होणे किंवा पुढील कार्यवाहीच होत नाही. त्यामुळे नोंदणी करणे अशक्य होत आहे. नुकसानीची नोंदणी ऑनलाइन करताना पहिला मोबाइल नंबर रजिष्टर करावा लागतो. त्यानंतर ओटीपी येतो. तर अनेक वेळा नंबर रजिष्टर करूनही ओटीपी येत नाही. आलाच तर दिलेल्या वेळेत अपलोड होत नाही.

सांगलीत विमा कंपनीचे कार्यालयच नाही
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, या कंपनीची पीकविम्यासाठी निवड करण्यात आली आहे. कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्यात कुठेही कार्यालय नाही. कंपनीचे प्रतिनिधी कृषी विभागाच्या कार्यालयात बसूनच काम करतात. हेल्पलाइन नंबर कंपनीने दिला असला तरी, तो कायम बिझी लागतो, अशी अवस्था आहे. शिवाय आमच्या पिकांचे नुकसान झाले तरीही कंपनीची प्रतिनिधी पंचनामा करण्यासाठी येत नाही, अशी माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

कंपनीने सांगलीसाठी जिल्हा समन्वयक, जिल्हा व्यवस्थापक आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक प्रतिनिधी अर्थात दहा तालुक्यांत दहा प्रतिनिधी, अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. पीकविमा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभाग प्रसिद्धी माध्यमांद्वारे करीत असतो. मात्र, कंपनीकडून फारशी प्रसिद्धी होताना दिसत नाही. हेल्पलाइन नंबर तरी तो कधी लागतो, तर कधी लागत नाही अशी परिस्थिती आहे.

पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनीच पीकविमा कंपन्यांना फोन करून त्याचे फोटो स्वतः काढून कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे द्यावे लागतात, ही मोठी समस्या असल्याचे शेतकरी म्हणतात. फोन केल्यानंतर किमान पंचनामा करण्यासाठी येणे अपेक्षित असते, परंतु दोन-तीन दिवस पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीची प्रतिनिधी येतच नाही. कृषी विभागाने केलेले पंचनामेच गृहीत धरले जातात.
 


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...