आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना फटका

farmers suffering due to Sugar factories closed in Attapadi taluka
farmers suffering due to Sugar factories closed in Attapadi taluka

खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर पाण्यामुळे आटपाडी तालुक्‍यात उसाचे क्षेत्र एक हजारावर एकरने वाढले. मात्र, बंद साखर कारखान्यांमुळे उसाच्या तोडी लांबल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या वर्षापेक्षा पुढील वर्षी ऊस कारखान्यास घालवण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागेल, अशी स्थिती आहे. 

टेंभू योजनेच्या पाण्यामुळे बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब, ऊस व भाजीपाला यांसारखी नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. वर्षभर पाण्याची अडचणच येत नसल्याने शेतकरी त्याकडे वळले आहेत. यावर्षीही ऊस क्षेत्रात लागणी वाढल्या आहेत. प्रत्येक वर्षी ऊस क्षेत्रात वाढ होत आहे. आत्तापर्यंत ऊस क्षेत्र कमी असल्याने प्रत्येक वर्षी हंगामात तोडी वेळेत येऊन ऊस तोडला जात होता. 

गतवर्षी तालुक्‍यातील राजेवाडी, आटपाडी, नागेवाडी हे कारखाने सुरू होते. त्यामुळे तोडी वेळेत येऊन ऊस तोडण्यात आला. गाळपही वेळेत झाले. यावर्षी आटपाडी, नागेवाडी, तासगाव कारखाना बंद असल्याने ऊसतोडी मोठ्या प्रमाणात थंडावल्या आहेत.

राजेवाडी व खानापूर तालुक्‍यातील उदगिरी हे दोनच कारखाने सुरू आहेत. त्यांच्या टोळ्याही कमी असल्यामुळे उसाचे क्षेत्र ६० ते ७० एकर शिल्लक राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकांवर लक्ष केंद्रित केले. मात्र, बंद कारखान्यामुळे ऊसतोड हंगाम जास्त लांबण्याची शक्‍यता आहे. 

जवळच्या तोडीस कारखान्यांची पसंती

खानापूर तालुक्‍यात तीन साखर कारखाने व आटपाडी तालुक्‍यात दोन कारखाने आहेत. तिथे प्रत्येकी एक कारखाना सुरू आहे. मात्र, ऊस जास्त असल्यामुळे तोडी जवळपासचा ऊस उचलत आहेत. 

 उसाचे क्षेत्र दुपटीने वाढले

गतवर्षी लागणीच्या उसास अजून तोडी मिळाल्या नाहीत. यंदा अशी स्थिती आहे, तर पुढील वर्षी प्रश्न अजून मोठा होण्याची शक्‍यता आहे. उसाची गत वर्षाची लागण व यावर्षी झालेली लागण पाहता लागवड क्षेत्र दुपटीने वाढले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com