राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीच्या मोबदलाप्रकरणी शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

 राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीच्या मोबदलाप्रकरणी शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनीच्या मोबदलाप्रकरणी शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकऱ्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग बाळापूर तालुक्यातून गेला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मुरलीधर राऊत (वय ४२, शेळद), मदन हिरपकार (वय ३२, कान्हेरी गवळी),साजिद इक्बाल शे. मोहम्मद (वय ३०, बाळापूर), मो. अफजल गुलाम नबी (वय ३०, बाळापूर), निळकंठराव देशमुख आणि अर्चना टकले (वय ३०, बाळापूर) यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. २०१३ पासून भूसंपादनाची प्रक्रिया आजही सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रिधोरा ते बाळापूरदरम्यानच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त जमीन घेण्यात आली, तर मोबदला देताना जुन्या आणि नव्या दरात तफावत असल्याने शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाला.  या शेतकऱ्यांनी याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी, उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांकडे केली आहे. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे वाढीव मोबदला मिळण्यासाठी प्रलंबित आहे. प्रकरणाचा निपटारा लवकर होत नसून, तारीख-पे-तारीख देण्यात येत आहे. याप्रकरणी या शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत ४ ऑगस्टपर्यंत निकाल लावण्याची मागणी केली होती. मात्र, निकाल न लागल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, सायंकाळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com