agriculture news in marathi, farmers take a initiative for increase a bamboo prodution, pune, maharashtra | Agrowon

बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुढाकार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

आमच्या गावात चार व्यक्तींनी बांबूच्या पेऱ्यापासून रोपवाटिका तयार केली आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका केल्या आहेत. एका रोपवाटिकेमध्ये सुमारे २०० ते ३०० रोपे आहेत. त्यासाठी आत्माच्या माध्यमातून केरळला जाऊन प्रशिक्षण घेतले होते. जवळपास दहा ते १२ इंच उंचीच्या दरम्यान रोपे आहेत. त्याची लागवड लवकरच करणार आहे. 
- महेश धुमाळ, शेतकरी, पसुरे, ता. भोर, जि. पुणे.

पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही तालुक्यातील २६ शेतकऱ्यांनी आत्माच्या माध्यमातून बांबूच्या रोपवाटिका उभारल्या आहेत. या रोपवाटिकेत सुमारे पंधरा हजार रोपे तयार झाली असून, या पावसाळ्यात या रोपांची लागवड केली जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांतील जमीन ही डोंगर उताराची असल्याने खाचरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी भाताची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यातच बांधबंदिस्ती अधिक असल्याने या बांधावर अनेक शेतकऱ्यांनी फळझाडे आणि बांबूची लागवड केली आहे. त्यामुळे भातशेतीसह फळझाडांच्या माध्यमातूनही चांगले उत्पादन काही शेतकरी घेत आहेत. याशिवाय या भागात बांबू पिकासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे भोर, वेल्हा, मावळ व मुळशी तालुक्यात नैसर्गिकरीत्या वाढलेली बांबूची बेटे मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच पारंपरिक पद्धतीने बांबूची लागवड या भागातील काही शेतकरी करतात. परंतु व्यावसायिकदृष्ट्या बांबू लागवडीबाबत विशेष प्रयत्न झालेले दिसत नव्हते.

आत्माअंतर्गत या तालुक्यात गट स्थापन करून २६ शेतकऱ्यांना केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, पिची, त्रिसूर येथे प्रशिक्षण आयोजित करून व्यापारी तत्त्वावर बांबू लागवडीची माहिती देण्यात आली.   गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी प्रामुख्याने मेस जातीच्या बांबूची लागवड करतात. परंतु या जातीची रोपे फारशी उपलब्ध होत नाही. त्यामुळे लागवडीवर बंधने येत होती. नेमका तोच धागा पकडून या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर मेस जातीच्या बांबूची रोपे तयार करण्यासाठी बांबू रोपवाटिका व्यवस्थापनाची आत्माच्या माध्यमातून चार प्रशिक्षणे घेतली. या प्रशिक्षणातील माहितीच्या आधारे २६ शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करून रोपे उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...
पाटण तालुक्यात भातलागणीस वेगपाटण, जि. सातारा ः तालुक्‍यात मॉन्सूनने २७...
नगर झेडपी घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर...नगर ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा...
मराठवाड्यात ‘महारेशीम’साठी १० हजारांवर...औरंगाबाद :  शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्...नाशिक  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचे...
सांगली जिल्ह्यातील ५२ प्रकल्प कोरडेसांगली : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीही...