सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच..

सरसकट कर्जमाफीसाठी ताकतोडा येथील शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच
सरसकट कर्जमाफीसाठी ताकतोडा येथील शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

सेनगाव, जि. हिंगोली : सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पीकविमा परतावा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी ताकतोडा (ता. सेनगाव) येथील शेतकरी, ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी (ता. २६) आठव्या दिवशीही सुरूच होते. हाताळा (ता. सेनगाव) येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २५) ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. 

शासकीय, प्रशासकीय पातळीवर मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने या दोन गावातील शेतकरी, ग्रामस्थांचे उपोषण शुक्रवारीही सुरु राहिले. गेल्या चार वर्षापासून अत्यल्प पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळामुळे सेनगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात गतवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

यंदा देखील कमी पावसामुळे खरीप पिकांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे खाजगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करावे, जिल्हा केंद्र शासित घोषित करावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी ताकतोडा गाव विकत घ्यावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता.१९) पासून विविध आंदोलने सुरू केली. परंतु या आंदोलनाकडे शासन, प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले. त्यामुळे मंगळवार (ता. २३) पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. गुरुवारी (ता.२५ गावकऱ्यांनी एकदिवस अन्नत्याग आंदोलन केले. बेमुदत उपोषण करणाऱ्यांपैकी नामदेव पतंगे, नामदेव सावके, विजय सावके, कैलास सावके यांची प्रकृती खालावली आहे. 

हाताळा येथील शेतकऱ्यांनी सुद्धा सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा गाव आणि शेती विकत घ्यावी, अशी मागणी करत गुरुवारी (ता. २५) पासून ग्रामपंचायत समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com