तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकरी संघटनेचे आज 'इमेल आंदोलन'

नाशिक : ‘‘भारतात जनुक सुधारित बियाण्यांना परवानगी मिळवी, यासाठी शेतकरी संघटनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंधीत मंत्र्यांना इमेल पाठवण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. आज (ता.२८) स्व.अजित नरदे य‍ांच्या पहिल्या जयंतीच्या दिवशी हे आंदोलन करण्यात येईल’’, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
 Farmers for technology freedom 'Email Movement' of the Farmer organization today
Farmers for technology freedom 'Email Movement' of the Farmer organization today

नाशिक  : ‘‘भारतात जनुक सुधारित बियाण्यांना परवानगी मिळवी, यासाठी शेतकरी संघटनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंधीत मंत्र्यांना इमेल पाठवण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. आज (ता.२८) स्व.अजित नरदे य‍ांच्या पहिल्या जयंतीच्या दिवशी हे आंदोलन करण्यात येईल’’, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. 

जगभरामध्ये जनुक सुधारीत (जेनिटिकली मॉडिफाईड) बियाणे वापरले जाते. त्या आधारे कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन अनेक देशात घेतले जात आहे. भारतात मात्र फक्त कापसाच्या'बी जी-२'या जिएम वाणानंतर कोणत्याही वाणास किंवा पिकाच्या जिएम बियाण्याला परवानगी देण्यात आलेली नाही.

जिएम पिकांचे बिजोत्पादन, पॅकिंग व विक्री गुजरात, आंध्रप्रदेश व तेलंगणात प्रामुख्याने होते. तेथे शेतकऱ्यांवर पोलिस कारवाई होत नाही. मात्र, महाराष्ट्रात धाडी टाकून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. देशात जिएम पिके घेण्यास बंदी आहे; मात्र जिएम सोयाबीनपासून तयार केलेले तेल सरकार अधिकृतपणे आयात करते हा काय प्रकार आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

यापूर्वी अकोला जिल्ह्यात किसान सत्याग्रह करून सविनय कायदेभंग केला. सरकारला जिएम पिकांना परवानगी देण्याची मागणी केली होती.मात्र सरकारने संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशिकर, मधुसुदन हरणे, सचिन जोशी, सतीष दाणी, ललित बहाळे, विजय निवल, गुणवंत पाटील, राम नेवले, सचिन डाफे, विनोद दुबे आदींनी ऑडिओ कॉन्फरंसद्वारे संवाद साधत आंदोलन पुकारले, असे घनवट यांनी कळविले.  अन्यथा, देशभर ‘मै भी गुनेहगार’ आंदोलन 

आठ दिवसांत सरकारने जिएम बियाण्यांना परवानगी दिली नाही, तर त्या नंतर ‘मै भी गुनेहगार’ आंदोलन देशभर सुरु करण्यात येइल. त्यात शेतकरी जाहीरपणे जिएम कापूस, सोयाबीन, मका, वांगी, मोहरी या पिकांच्या लागवडी करतील. प्रशासनाला कळवतील. शेतकरी हा गुन्हा करतील व आपल्या शेतात ‘मी जिएम शेतकरी, मै भी गुनेहगार’ असे फलक लावतील, असा इशारा संघटनेने दिला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com