कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे शेतकरी धास्तावले

कोल्हापूर पूर
कोल्हापूर पूर

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडीप असली तरी सर्वच धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणी जलदगतीने वाढत आहे. याचा फटका आता निवासी वस्तीला बसत आहे. दररोज हजारो एकर शेती पाण्याखाली जात नसल्याने यंदा पिकाचे नुकसान पुरामुळे होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. पाणी वाढतच असल्याने नदीकाठच्या पिकांचे तर शंभर टक्के नुकसान होण्याची शक्‍यता आहे. रविवारी दुपारपर्यंत पावसाची उघडझाप सुरू होती.  जिल्ह्यात बारापैकी सात तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक १५८ मि.मि. पावसाची नोंद झाली. शिरोळमध्ये सर्वात कमी २३.८६ मिमी पाऊस झाला. रविवार दुपारपर्यंत एकूण ८६ बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापूर रत्नागिरी रोड येलूरपैकी मावलेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. अलमट्टी धरणातून २५८७१०; कोयनेतून ५०२१८ तर राधानगरीतून ७११२ क्‍युसेक विसर्ग सुरू आहे.  ‘राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३,४,५ व ६ सुरू आहेत. यामधून ७११२ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसेच अलमट्टी धरणामधून २५८७१० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली कोयना धरणामधून रविवारी दुपारी दुपारी दोन वाजेपर्यंत ५०२१८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.  पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दुपारी २ वाजता ४५ फूट ३ इंच असून एकूण ८६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात रविवार अखेर ८.३० टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहेत. सर्वच धरणांतून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (टी.एम.सी.)  तुळशी ३.१८, वारणा ३३.२०, दूधगंगा १९.७८, कासारी २.४७ , कडवी २.५१, कुंभी २.५८, पाटगाव ३.३४, १.१९, चित्री १.८८, जंगमहट्टी १.२२, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, कोदे (ल. पा.) ०.२१ टीएमसी 

बंधाऱ्यांची पाणीपातळी (रविवारी दुपारी दोन पर्यंतची) : पंचगंगा नदीची राजाराम ४४.१० फूट, सुर्वे ४२.३ फूट, रुई ७२.३ फूट, इचलकरंजी ६७.६ फूट, तेरवाड ६४ फूट, शिरोळ ६१.९ फूट, नृसिंहवाडी ६१.३ फूट, राजापूर ४९.६ फूट तर नजीकच्या सांगली ४०.४ फूट आणि अंकली ४४ फूट अशी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com