agriculture news in marathi, farmers throw tomoto due to low rate,satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

जमीन खंडाने घेऊन टोमॅटोचे पीक घेतले. त्यासाठी कर्जही काढले आहे. मात्र, बाजारात टोमॅटोला दरच नसल्याने उत्पादन खर्चही अंगावर फिरला आहे. त्यामुळे कर्ज कशातून फेडायचे? दर नसल्याने बाजारात टोमॅटो नेणेही परवडत नाही. त्यामुळे टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.
- सतीश झोंबाडे, शेतकरी, दक्षिण तांबवे, जि. सातारा 

कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक घेतले. मात्र, टोमॅटोचे दर गडगडल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. कमी कालावधीत चार पैसे जादाचे मिळतील, या आशेने अनेकांनी कर्ज काढून, व्याजाने पैसे घेऊन टोमॅटो लागवड केली. आता या पिकाला मातीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, बाजारात टोमॅटो नेण्यासाठी वाहतूक खर्चही अंगावरच फिरत असल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.

केवळ तीन ते चार महिन्यांत चांगला अार्थिक फायदा होईल, या हेतूने शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले. त्यासाठी अनेकांनी बॅंका, पतसंस्था, हातऊसने करून पैसे घेऊन त्यातून पीक वाढवले. मध्यंतरी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने काही ठिकाणी टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. त्यातूनही सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने टोमॅटोचे पीक घेतले. मात्र, त्यानंतर बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर कमी झाले आहेत.

सध्या टोमॅटोचा १० किलोचा दर २५ ते ३५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. केवळ अडीच ते साडेतीन रुपये किलोने टोमॅटो विकावे लागत असल्याने वाहतूक खर्चही त्यातून निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या तोट्यात आले आहेत.

दिवसरात्र कष्ट करूनही शेतकऱ्यांना मातीमोल भावाने टोमॅटो विकावे लागत आहेत. उत्पादन खर्चही निघाला नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. बाजारात नेण्याची वाहतूक भाडेही परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी जनावरांपुढे टोमॅटो ओतले आहेत, तर काहींना शेतकऱ्यांनी ते फेकून दिले आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...