agriculture news in marathi farmers tractor Pared, Delhi | Agrowon

शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’चीच राजधानीत चर्चा

वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनातील ५९व्या दिवशीही शेतकऱ्यांचा उत्साह कायम होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनातील ५९व्या दिवशीही शेतकऱ्यांचा उत्साह कायम होता. सरकारने बोलणी थांबविली असली, तरी ‘जोपर्यंत कायदे वापसी नाही, तोपर्यंत घर वापसी नाही’ असे आंदोलकांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड संदर्भातील नियोजनावर संपूर्ण दिवसभर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाना पोलिसांबरोबर मार्गनिश्‍चितीबाबतच्या बैठका दिवसभर सुरू होत्या. शेतकऱ्यांच्या २६ जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर परेडबाबत पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तरांचलमध्ये नियोजन सुरू असून, काही भागातील ट्रॅक्टर दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

या परेडसाठी दिल्लीतील रिंगरोडची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवरून केंद्र सरकारमधील मंत्री आणि अनेकांनी वाद निर्माण केल्यानंतर शेतकऱ्यांनी भारतीय तिरंगा लावून दिल्लीत प्रजासत्ताकदिनी परेड करण्याची घोषणा केली होती. या परेडमध्ये शेतकरी काही देखावेही सादर करण्याची शक्यता आहे, याकरिता ट्रॉलीच्या रचनेत काहींनी बदलही केले आहेत.

संशयिताला पकडले...
शुक्रवारी रात्री (ता.२२) शेतकऱ्यांनी एका संशयिताला पकडून माध्यमांसमोर हजर केले होते. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान घातपात घडविण्याच्या उद्देशाने तो आला होता. त्याला सिंघू आंदोलनस्थळी रात्रीच्या गस्तीवरील शेतकऱ्यांच्या पथकाने पकडले. चौकशी केल्यानंतर त्याने १० जणांच्या गटाला घातपात घडविण्यासाठी पाठविल्याचे व चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्यासाठी पाठविल्याचे माध्यमांसमोर सांगितले. यानंतर त्यास हरियाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, यानंतर पोलिसांनी त्याच्या जबाबाचा व्हिडिओ माध्यमांना पाठविला. त्यात त्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त होते.


इतर अॅग्रो विशेष
विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजनवर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे...
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...