शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर सजले
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मुख्य परेड नंतर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ‘किसान गणतंत्र परेड’ची जय्यत तयारी झाली आहे.गाजीपूर आणिटिकरी येथे शेतकरी ट्रॅक्टर परेडसाठी सज्ज झाले आहेत.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मुख्य परेड नंतर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ‘किसान गणतंत्र परेड’ची जय्यत तयारी झाली आहे. उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवरील गाजीपूर आणि दिल्ली हरियानाच्या सीमेवरील टिकरी येथे शेतकरी ट्रॅक्टर परेडसाठी सज्ज झाले आहेत.
उत्तर प्रदेशमधून गाजीपूर येथे, तर पंजाब, हरियानामधून टिकरी येथे मोठ्या संख्येने टॅक्टर जमा झाले आहेत. परेडमध्ये सहभागी होणारे ट्रॅक्टर सजविण्यात आले आहेत. अनेक ट्रॅक्टरवर शेती आणि शेतकरी संबंधी देखावे तयार करण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी मुख्य परेड झाल्यानंतर ट्रॅक्टरची रॅली काढण्यास परवानगी दिल्यानंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी ट्रॅक्टर रॅलीला ‘किसान गणतंत्र परेड,’ असे नाव दिले आहे.
किसान मजदूर संघर्ष समितीचे सुखबीर सिंग सबहरा म्हणाले, ‘‘आम्हाला ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिलेली परवानगी चुकीची आहे. आम्हाला जुन्या रिंग रोडवरून रॅली काढायची होती. मात्र पोलिसांनी नव्या रिंग रोडवरून रॅली काढण्याची परवानगी दिली आहे. नव्या रिंग रोडचा मार्ग बहुतेककरुन हरियानाच्या हद्दीत येतो.
आम्ही या बाबत दिल्ली पोलिसांबरोबर आज पुन्हा चर्चा करणार आहोत. त्यानंतर ट्रॅक्टर रॅलीच्या मार्गाबाबत अंतिम निर्णय घेऊ.
या बाबत दिल्ली पोलिसांच्या गुप्तहेर विभागाचे स्पेशल कमिशनर दीपेंद्र पाठक म्हणाले, ‘‘
शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर रॅली काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तो मार्ग सोडून तीन वेगवेगळ्या मार्गावर रॅली काढण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. हे तीनही मार्ग दिल्लीच्या सीमेवरील आहेत. ट्रॅक्टर रॅली गाजीपूर, टिकरी, सिंघु सीमेवरून दिल्लीत प्रवेश करेल आणि पुन्हा त्याच ठिकाणी माघारी जाईल.’’
- 1 of 1055
- ››