औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत ज्वारी, हरभऱ्याकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

Farmers' trend towards tide, gram in Aurangabad, Jalna, Beed Districts
Farmers' trend towards tide, gram in Aurangabad, Jalna, Beed Districts

औरंगाबाद : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीच्या पेरणीला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यानंतर गहू, मका पिकाकडे शेतकरी वळला असल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार २८६ हेक्‍टर होते. त्यापैकी ७५ टक्‍के अर्थात ६ लाख ४ हजार ६४८ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी उरकली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख २० हजार ९७३ हेक्‍टर, जालना १ लाख ५८ हजार ८३४ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील ३ लाख २४ हजार ८४१ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार १८८ हेक्‍टर होते. त्यापैकी १ लाख २० हजार ९७३ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात ३० हजार १६६ हेक्‍टर क्षेत्रावरील ज्वारी, ४५ हजार ४०४ हेक्‍टर क्षेत्रावरील गहू, ११ हजार ५१६ हेक्‍टरवरील मका, ५५१ हेक्‍टरवरील इतर तृणधान्य, ३३ हजार २०४ हेक्‍टरवरील हरभरा, ६ हेक्‍टरवरील इतर कडधान्य, ३६ हेक्‍टरवरील करडई, ३६ हेक्‍टरवरील मोहरी, ९ हेक्‍टरवरील जवस, ४५ हेक्‍टरवरील इतर गळीतधान्य आहे. बीड जिल्ह्यात क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्‍टर होते. त्या तुलनेत ३ लाख २४ हजार ८४१ हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यात १ लाख ७० हजार ८८८ हेक्‍टर ज्वारी, २६ हजार ५५७१ हेक्‍टर गहू, २४५९ हेक्‍टर मका, ३० हेक्‍टर इतर तृणधान्य, १ लाख २४ हजार १५३ हेक्‍टर हरभरा, २११ हेक्‍टर इतर कडधान्य, ३६४ हेक्‍टर करडई, १०७ हेक्‍टर जवस, तर ५२९ हेक्‍टर इतर गळीत धान्यांचा समावेश आहे.

जालन्यात दीड लाख हेक्टरवर रब्बी

जालना जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत १ लाख ५८ हजार ८३४ हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यात ७० हजार ८३३ हेक्‍टरवरील रब्बी ज्वारी, ३४ हजार ३१८ हेक्‍टरवरील गहू, १० हजार ९८५ हेक्‍टरवरील मका, ४२ हजार १०८ हेक्‍टरवरील हरभरा, २३२ हेक्‍टरवरील करडई, ७२ हेक्‍टरवरील मोहरी, २८६ हेक्‍टरवरील इतर गळीत धान्यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com