Agriculture news in marathi Farmer's trick to save the crop from wildlife | Page 3 ||| Agrowon

वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची युक्ती 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी शेतीच सोडून देत आहेत. हा उपद्रव थांबवण्यासाठी तालुक्यातील विन्हे गावचे शेतकरी रुपेश वामन पवार यांनी शक्कल लढवली असून त्याला यशही आले आहे.

मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी शेतीच सोडून देत आहेत. हा उपद्रव थांबवण्यासाठी तालुक्यातील विन्हे गावचे शेतकरी रुपेश वामन पवार यांनी शक्कल लढवली असून त्याला यशही आले आहे. मोबाईल, स्पीकर एकमेकांशी जोडून उपकरण बनवले. त्याला त्यांनी ‘डुक्कर पळविण्याचा जुगाड’ असे नाव दिले आहे. 

जुगाड बनवताना रुपेशनी तंत्रज्ञानाचा वापर केला. मोबाईल ब्लू टूथला कनेक्ट होणारा स्पीकर घेतला. मोबाईलमधील अलार्म सेटिंग व कॅलेंडरचा वापर करून रिंगटोनमध्ये मेमरी कार्डमधील गाणी निवडली. ही गाणी दर दहा मिनिटांनी अलार्मनुसार स्पीकरवर वाजली जातात. त्यात प्राणी, वाघाच्या डरकाळी, ढोलताशांचे आवाज, गोंगाट याचा समावेश आहे. यामुळे शेताकडे येणारी डुक्करे आपला मार्ग बदलून निघून जातात. या युक्तीने यंदा भाताचे नुकसान टळल्याचे त्यांनी सांगितले. 

रुपेश पवार अपंग आहेत. शेतीचा अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची कास धरणारे प्रगतशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंगत्व आले. मात्र, कुढत न बसता लढायचं असा निर्धार करून शेतीत आईवडिलांसोबत शेतात राबू लागले. शेतीचे तंत्र, मंत्र शिकायला पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय गाठले. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतीविषयक मासिके, अ‍ॅग्रोवन वाचून अभ्यास करून शेती सुरू केली. जंगली श्वापदे, प्रामुख्याने रान डुकरांकडून शेतीची नासधूस करण्यात येते. त्यावर काम करत असताना हे जुगाड बनवले. 

कष्टाचे फळ मिळण्याच्या वेळेला जंगली श्वापदांमुळे शेतीचे नुकसान होते. यात रानडुकरांचा उपद्रव जास्त असतो. यावर ही शक्कल लढवली. त्यामुळे यावर्षी माझे पीक वाचले. 
- रुपेश पवार, शेतकरी, विन्हे, जि. रत्नागिरी 


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...