agriculture news in marathi, Farmers tries suicide for electricity connection in Ahmednagar | Agrowon

वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही वीजजोडणीसाठी सहा वर्षांपासून विद्युत खांब टाकले जात नसल्याचा संताप अनावर झाल्याने रांजणी (ता. नगर) येथील शेतकऱ्याने गुरुवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र,  त्याच वेळी घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी व पत्रकारांनी संबंधित शेतकऱ्यास रोखल्याने अनर्थ टळला. सखाराम लक्ष्मण ठोंबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही वीजजोडणीसाठी सहा वर्षांपासून विद्युत खांब टाकले जात नसल्याचा संताप अनावर झाल्याने रांजणी (ता. नगर) येथील शेतकऱ्याने गुरुवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र,  त्याच वेळी घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी व पत्रकारांनी संबंधित शेतकऱ्यास रोखल्याने अनर्थ टळला. सखाराम लक्ष्मण ठोंबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

रांजणी (ता. नगर) येथे ठोंबे यांची चार एकर शेती आहे. तेथे नवीन वीज जोडणीसाठी ठोंबे यांनी १० मार्च २०१२ रोजी रीतसर अर्ज करून पैसेही भरले. मात्र, अजूनही त्यांना महावितरणकडून रीतसर वीजजोडणी मिळालेली नाही. शेजारील शेतकरी त्यांच्या शेतात विजेचे खांब रोवण्यासाठी प्रतिबंध करीत आहेत, तसेच त्यांनी रस्ताही अडविल्याची ठोंबे यांची तक्रार आहे.

त्या संदर्भात ठोंबे यांनी पाच मार्चला महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व सहा मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आत्मदहन आंदोलनाची कल्पना दिली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात आल्याने ठोंबे यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आत्मदहनाचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर सोबत आणलेल्या ड्रममधील रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच वेळी तेथे उपस्थित पोलिस कॉन्स्टेबल वसीम पठाण व सचिन गोरे, तसेच खासगी कामानिमित्त आलेले प्रेस क्‍लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख व ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज यांनी तत्काळ शेतकऱ्याच्या हातातून रॉकेलचा ड्रम हिसकावला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतकऱ्याच्या खिशात तीन काड्यापेट्या आढळून आल्या. एखादी काडेपेटी निकामी झाल्यास दुसरी कामी येईल, अशी त्यामागे अटकळ होती.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...