शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ः डॉ. पवार

नाशिक : ‘‘ शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल; तर निदान त्यांना अडचणीत तरी आणू नका,’’ अशा शब्दांत खासदार डॉ. भारती पवार यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
Farmers in trouble Don't bring: Dr. Pawar
Farmers in trouble Don't bring: Dr. Pawar

नाशिक : ‘‘वीज महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सक्तीने वीजबिले आकारण्यात येत आहेत. ज्यांचे वीजबिल थकीत आहे, अशा शेतकऱ्यांची वीजजोडणी खंडित केली जात आहे. त्यामुळे शेतातील पिकांना विजेअभावी पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल; तर निदान त्यांना अडचणीत तरी आणू नका,’’ अशा शब्दांत खासदार डॉ. भारती पवार यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

वीज महावितरणासंबंधी शुक्रवारी (ता.२६) अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली. त्या वेळी डॉ. पवार यांनी संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, वीज महावितरणचे दरोली आदी उपस्थित होते. 

डॉ. पवार म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या संकटकाळातून शेतकरी सावरतोच नाही, तर अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. आता राज्य सरकारने अधीकचा महसूल मिळावा म्हणून वीजबिल भरण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची वीजजोडणी खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.’’ 

‘‘कृषी संजीवनी योजना ही थकीत बिले वसुलीसाठी नाही. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. 

बैठकीतील मागण्या...

  •   जादा बिलांची फेरतपासणी करा
  •   वीजबिलांत सवलत द्या
  •   हप्ते करून वीज बिले भरण्याचा पर्याय द्या
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com