agriculture news in Marathi farmers in trouble due to cotton procurement stopped Maharashtra | Agrowon

परभणीत कापूस खरेदी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी केली. परंतु खरेदी सुरु नसल्यामुळे चार एकरातील 
सर्व वेचण्यांचा मिळून ६२ क्विंटल कापूस घरात पडून आहे. ऊन वाढले आहे. त्यामुळे घरात कापूस ठेवणे 
जोखमीचे आहे. भाव काहिपण मिळो, खरेदी सुरु करावी. 
- महादेव राऊत, शेतकरी, मांडाखळी, जि. परभणी 

परभणी ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) तसेच खाजगी व्यापाऱ्यांची कापूस खरेदी गेल्या २५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुमारे सात लाख क्विंटल कापूस घरातच पडून आहे. त्यातच तापमानवाढीमुळे कापसाच्या दर्जावर परिणाम होत असून खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. 

जिल्ह्यातील तापमानात ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. या परिस्थितीत घरात कापूस ठेवणे अत्यंत धोकादायक झाले आहे. खरिपाच्या पेरणीसाठी निविष्ठांची तजवीज करण्यासाठी पैशाची गरज आहे. कापूस उत्पादकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तत्काळ कापूस खरेदी सुरु करण्याची गरज आहे. 

शेतकऱ्यांनी पणन महासंघ आणि सीसीआयकडे मोठ्या प्रमाणावर कापूस घातला. परंतु कधी रुईच्या गाठी तसेच सरकी साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे तर कधी ग्रेडर नसल्यामुळे तर अनेकदा ढगाळ वातावरण, बिगर मोसमी पाऊस आदी कारणांनी पणन महासंघ तसेच सीसीआयची कापूस खरेदी बंद राहिली. त्यात दरात खुल्या बाजारातील दरात सुधारणा न झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात पणन महासंघ आणि सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या. 

खरेदी केंद्रांवर मोजमापास विलंब लागला त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी वाहन भाड्याचा भुर्दंड बसला. लॅाकडाऊनमुळे पणन महासंघ, सीसीआय तसेच परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील खाजगी कापूस खरेदी २२ मार्च पासून बंद आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक सोशल डिस्टींग राखणे शक्य नसल्यामुळे पणन महासंघाची कापूस खरेदी सुरु करणे शक्य नाही, असे नुकतेच जाहीर करण्यात आले.

सीसीआयकडून तसेच खासगी कापूस खरेदी सुरु करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे नियोजन दिसत नाहीत. त्यामुळे विक्री व्यवस्थेअभावी अभावी कापूस घरात पडून असल्यामुळे रब्बी हंगामातील शेतमाल साठविण्यासाठी अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे घरात कापूस साठवून ठेवण्यामध्ये जोखीम आहे. 

परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता.२०) पणन महासंघाची ४ लाख ७८ हजार ६६५ क्विंटल, सीसीआयची ८ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल, खाजगी व्यापाऱ्यांकडून ५ लाख ९३ हजार ९८३ क्विंटल अशी एकूण १९ लाख ६१ हजार १४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. 

सात लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात 
सुरुवातीला नव्हती परंतु गर्दी वाढल्यामुळे अखेरच्या टप्प्यात पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागत आहे.परभणी,गंगाखेड, पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मिळून सहा हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लॅाकडाऊनमुळे नोंदणी बंद आहे. अन्य ठिकाणच्या बाजार समित्यांत नोंदणी सुरु नाही. परभणी तालुक्यात १ लाख ४० हजार क्विंटल 
कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा आदी तालुक्यातील मिळून सुमारे सात लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. 

प्रतिक्रिया
कापूस विक्रीसाठी तीन बाजार समित्यांअंतर्गत शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सरकी साठविण्यासाठी जागा कमी पडत आहे. हमाल-कामगारांचा प्रश्न आहे. मे महिन्यात पूर्व मोसमी पाऊस सुरु राहिल्यास खरेदीत अडथळे येऊ शकतात. 
- ए. डी. रेनके, विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ, परभणी 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...