केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला. परंतु सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील परतीच्या आलेला मूग, उडीद, सोयाबीन, कापूस हे नगदी पीक गेले. त्यातच बागायती पिकालाही मोठा फटका बसला आहे. राज्यात जळगाव नंतर सर्वाधीक उत्पन्न देणाऱ्या केळी पिकाचा नांदेड जिल्ह्यात दर घटल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
Farmers in trouble due to fall in banana prices
Farmers in trouble due to fall in banana prices

नांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला. परंतु सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील परतीच्या आलेला मूग, उडीद, सोयाबीन, कापूस हे नगदी पीक गेले. त्यातच बागायती पिकालाही मोठा फटका बसला आहे. राज्यात जळगाव नंतर सर्वाधीक उत्पन्न देणाऱ्या केळी पिकाचा नांदेड जिल्ह्यात दर घटल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड तालुक्यासह परिसराला केळी उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. त्यामुळे या भागात उसानंतर शेतकरी केळी पिकाची लागवड करतात. रात्रंदिवस कष्ट करून लाखो रुपये खर्च करून केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र, केळी काढणीला सुरुवात झाल्यापासून दरात घसरण होत आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण केळीला ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होते. मधल्या काळात केळीच्या दरात थोडी सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा केळीच्या दरात घट झाली. पुन्हा केळीला ५०० ते ६०० रुपये दर मिळत आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात केळीच्या दरात वाढ होत असते. मात्र, यंदाच्या या काळात केळीच्या दराने निच्चांक गाठला आहे. व्यापारी कोरोनाचे निमित्त साधून केळी ही कवडीमोल दरात विकत घेत आहे. जिल्ह्यातील केळी प्रामुख्याने दिल्ली, चंदीगड, हरियाणा, मथुरासह अनेक ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जाते. त्याचबरोबर विदेशातही अर्धापुरच्या केळीची चव घेतली जाते. अतिवृष्टीमुळे केळीला रोगाची लागण झाल्याने केळी पिकण्यास सुरुवात झाली आहे. केळीचे घड झाडावरच असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच व्यापारी केळीची खरेदी करीत नसल्याने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही. यंदा केळी शेताच्या बाहेर काढणेसुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही. व्यापारी मनभाव केळी खरेदी करीत असल्याने केळीला कवडीमोल भाव मिळत आहे.

व्यापाऱ्यांच्या संगनमताने केळीचे दर पाडले जातात. नांदेडला जळगाव पॅटर्ननुसार केळीचे दर ऑनलाइन पद्धतीने ठरविले जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अनधिकृत खरेदीदार मनमानी पद्धतीने भाव काढतात, यामुळे नुकसान होत आहे. - ज्ञानेश्वर माटे, शेतकरी, अर्धापूर

काही स्थानिक व्यापाऱ्याकडून केळीला पाचशे ते सहाशे रुपये दर दिला जातो, हा दर कमी आहे. बाहेर राज्यात जाणाऱ्या केळीला सध्या सहाशे ते एक हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. - नारायण सोळुंखे, केळी व्यापारी, अर्धापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com