Agriculture news in Marathi Farmers in trouble due to fall in banana prices | Page 2 ||| Agrowon

केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला. परंतु सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील परतीच्या आलेला मूग, उडीद, सोयाबीन, कापूस हे नगदी पीक गेले. त्यातच बागायती पिकालाही मोठा फटका बसला आहे. राज्यात जळगाव नंतर सर्वाधीक उत्पन्न देणाऱ्या केळी पिकाचा नांदेड जिल्ह्यात दर घटल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

नांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला. परंतु सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील परतीच्या आलेला मूग, उडीद, सोयाबीन, कापूस हे नगदी पीक गेले. त्यातच बागायती पिकालाही मोठा फटका बसला आहे. राज्यात जळगाव नंतर सर्वाधीक उत्पन्न देणाऱ्या केळी पिकाचा नांदेड जिल्ह्यात दर घटल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड तालुक्यासह परिसराला केळी उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. त्यामुळे या भागात उसानंतर शेतकरी केळी पिकाची लागवड करतात. रात्रंदिवस कष्ट करून लाखो रुपये खर्च करून केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र, केळी काढणीला सुरुवात झाल्यापासून दरात घसरण होत आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण केळीला ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होते. मधल्या काळात केळीच्या दरात थोडी सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा केळीच्या दरात घट झाली. पुन्हा केळीला ५०० ते ६०० रुपये दर मिळत आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात केळीच्या दरात वाढ होत असते. मात्र, यंदाच्या या काळात केळीच्या दराने निच्चांक गाठला आहे. व्यापारी कोरोनाचे निमित्त साधून केळी ही कवडीमोल दरात विकत घेत आहे. जिल्ह्यातील केळी प्रामुख्याने दिल्ली, चंदीगड, हरियाणा, मथुरासह अनेक ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जाते. त्याचबरोबर विदेशातही अर्धापुरच्या केळीची चव घेतली जाते. अतिवृष्टीमुळे केळीला रोगाची लागण झाल्याने केळी पिकण्यास सुरुवात झाली आहे. केळीचे घड झाडावरच असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच व्यापारी केळीची खरेदी करीत नसल्याने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही. यंदा केळी शेताच्या बाहेर काढणेसुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही. व्यापारी मनभाव केळी खरेदी करीत असल्याने केळीला कवडीमोल भाव मिळत आहे.

व्यापाऱ्यांच्या संगनमताने केळीचे दर पाडले जातात. नांदेडला जळगाव पॅटर्ननुसार केळीचे दर ऑनलाइन पद्धतीने ठरविले जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अनधिकृत खरेदीदार मनमानी पद्धतीने भाव काढतात, यामुळे नुकसान होत आहे.
- ज्ञानेश्वर माटे, शेतकरी, अर्धापूर

काही स्थानिक व्यापाऱ्याकडून केळीला पाचशे ते सहाशे रुपये दर दिला जातो, हा दर कमी आहे. बाहेर राज्यात जाणाऱ्या केळीला सध्या सहाशे ते एक हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
- नारायण सोळुंखे,
केळी व्यापारी, अर्धापूर


इतर ताज्या घडामोडी
बच्चू कडूंनी फुंकले रणशिंग; शेतकऱ्यांसह...अमरावती : तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील...
डिसेंबरमधील पालवीवरच आंबा हंगाम अवलंबूनरत्नागिरी  : नोव्हेंबर महिन्यात थंडीऐवजी...
सुट्ट्यांमुळे कापूस खरेदीत खोडायवतमाळ : बहूप्रतिक्षेनंतर २७ नोव्हेंबरला...
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा...एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
परभणीत दीड लाख क्विंटल कापसाची खरेदीपरभणी :  भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (...
जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरूबुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव...
सटाणा तालुक्यात चार कोटींची नुकसानभरपाई...नाशिक  : सटाणा तालुक्यात ऑक्टोबर आणि...
भंडाऱ्यात ३४ कोटींची धान खरेदीभंडारा  : जिल्ह्यात आधारभूत दराने धान...
निम्न दुधानाचे बुधवारपासून आवर्तनपरभणी  : जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता. सेलू)...
भातपिकासह ट्रॅक्टर जळून खाकअस्वली स्टेशन, जि. नाशिक : इगतपुरी...
नगर जिल्ह्यात कांदा बियाण्याची टंचाईनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी...
ढगाळ वातावरणामुळे उसावर तांबेरासोमेश्वरनगर, जि. पुणे ः अतिवृष्टीपाठोपाठ आलेल्या...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे...बुलडाणा : मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या...
रब्बीसाठी पहिले आवर्तन पाच डिसेंबरला ः...जळगाव : ‘‘रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन...
धुळे जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात होणार...कापडणे, जि. धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने...
कुंभार पिंपळगावात आगीत चार एकर ऊस खाककुंभार पिंपळगाव, जि.जालना : राजाटाकळी- अरगडे...
द्राक्ष निर्यातवाढीसाठी शासन सहकार्य...अंतापूर, ता. सटाणा : ‘‘द्राक्षाचा पीकविमा बाराही...