agriculture news in marathi, farmers in trouble due to fuel price hike, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इंधन दरवाढीचा फटका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मी पूर्वी तासाला पाचशे ते सहाशे रुपये देऊन नांगरट करून घेत होतो. परंतु डिझेलचे दर वाढल्यामुळे आता तासाला सातशे रुपये द्यावे लागतात.  
- संतोष कारके, शेतकरी, डोणे, ता. मावळ, जि. पुणे

पुणे : दरवर्षी पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना आता त्यात डिझेल, पेट्रोल दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एेन रब्बी हंगामात आर्थिक ताळेबंद सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच शेतीमालाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने चांगलाच तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

देशासह, राज्यात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, शेतकरीही चांगलेच हैराण झाले आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्‍प्यात आला आहे. त्यातच बैलांच्या कमी संख्येमुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. बहुतांशी कृषी अवजारे ही इंधनावर चालतात. लवकरच रब्बी हंगाम सुरू होणार असून नांगरट करणे, यंत्राद्वारे पेरणी करणे, फवारणी करणे अशी अनेक कामे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकरी करतात. त्यासाठी डिझेल आणि पेट्रोलचा वापर होतो. मात्र, सध्या डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ ते ८० रुपयांपर्यंत, तर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८५ ते ९० रुपयांपर्यंत गेला आहे. या दरवाढीमुळे शेतीला थेट फटका बसणार आहे. इंधनाचे दर वाढल्याने

जिल्ह्यात नांगरट करणे, रोटा मारणे, पेरणी करणे, सरी पाडणे, फवारणी करणे अशा विविध कामांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. अनेक यंत्रधारकांनी या दरामध्ये २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ केली असल्याचे चित्र आहे. याशिवाय ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी डिझेल पंपाचा वापर केला जातो. त्यासाठी रोज पाच ते दहा लिटर डिझेल आवश्यक असते. मात्र, सातत्याने होणाऱ्या दरवाढीने हा खर्च वाढत चालला आहे. त्याचबरोबर शेतीमाल वाहतुकीच्या खर्चातही २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते.

मी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ट्रॅक्टरद्वारे नांगरट, सरी पाडणे, पेरणी करण्याचा व्यवसाय करतो. त्यासाठी कमी दर घेत होतो. गेल्या पाच ते सहा महिन्यांत इंधनाच्या दरवाढीमुळे पूर्वीपेक्षा नांगरटीच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ केली आहे. सध्या सिंगल नांगरटीसाठी यापूर्वी १२०० रुपयांपर्यंत दर घेत होतो आता त्यात दीड हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे, असे बोरीबेल (ता. दौंड) येथील व्यावसायिक  मंगशे मत्रे यांनी सांगितले.
 
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...