agriculture news in Marathi farmers in trouble due to lockdownMaharashtra | Agrowon

सोलापूर : द्राक्ष, डाळिंब कवडीमोल, कलिंगड, खरबूज थेट जनावरांना 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

माझी पाच एकर निर्यातक्षम द्राक्षबाग आहे. आता काढणीला आली आहे. स्थानिक भागात १०-१२ रुपये दर आहे. मला युरोपीय मार्केटमध्ये पाठवायचा आहे, प्रयत्न करतो आहे, किती दर मिळतो माहित नाही. १७ एकर डाळिंब आहे. पण त्याचा बहार संपला आहे. त्यालाही जेमतेमच दर मिळाला. शिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही आठ एकर खरबूज केले. पण दर नसल्याने मिळेल त्या दरात विकून टाकली. करणार काय, दुसरा पर्यायच नव्हता. 
- समाधान भोसले, शेतकरी, पापरी, ता.मोहोळ, जि. सोलापूर 

सोलापूर ः कोरोनामुळे सोलापूरसह नजीकच्या सर्व बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मार्चपर्यंत द्राक्ष, डाळिंबाला चांगला दर मिळत होता. पण गेल्या पंधरवड्यात द्राक्षाला १० ते १२ रुपये आणि डाळिंबाला १० ते २० रुपये किलो इतका दर खाली आला आहे. दुसरीकडे कलिंगड आणि खरबूज थेट जनावरांना खाऊ घातली जात आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात द्राक्षाचे जवळपास २५ हजाराहून अधिक एकर क्षेत्र आहे. तर डाळिंबाचे ५० हजाराहून अधिक एकर क्षेत्र आहे. डाळिंबाचा बहार बहुतेक भागात अंतिम टप्प्यात आहे. पण द्राक्ष उत्पाकांसह कलिंगड आणि खरबूज उत्पादकांची मात्र ऐन हंगामातच आर्थिक कोंडी झाली आहे. बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या पट्ट्यात द्राक्ष, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस भागात डाळिंब आणि मोहोळच्या पापरी, खंडाळी, पेनूरसह माढ्यातील कुर्डुवाडी, मोडनिंब या भागात कलिंगड आणि खरबूजा मोठा टप्पा आहे. 

उत्पादक भागातील वाहतूक पूर्णपणे बंद आहेच. पण मूळात बाजार समित्या बंद असल्याने त्याची विक्री करायची कुठे, हा प्रश्न आहे. द्राक्षाला प्रतिकिलोला १० ते १२ रुपये, डाळिंबाला १० ते २० रुपये किरकोळ विक्रीचे दर आहेत. तर कलिंगड आणि खरबूजाला ३ ते ४ रुपये दर मिळत आहे. कलिंगड आणि खरबूज उत्पादकांनी विक्रीपेक्षा जनावरांना खाऊ घालणे अधिक पसंत केले आहे.

कारण, या भागात एकेक शेतकऱयांकडे ५ ते २० एकरपर्यंत या फळांचे क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडील फळाची किरकोळ विक्रीही होऊ शकत नाही, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज या महत्वाच्या बाजारपेठा जिल्ह्यात आहेत. पण मुंबई आणि पुणेही सोलापूरसाठी महत्वाची बाजारपेठ आहे. पण त्याही बंद असल्याने अडचण झाली आहे. मुंबई आता सुरु झाली असली, तरी वाहनाची अडचण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर फळ उत्पादकांची चांगलीच गोची होऊन बसली आहे. 

 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...