agriculture news in Marathi farmers in trouble due to rate cut Maharashtra | Agrowon

दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने दूध उत्पादकांची परवड होत आहे.

औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने दूध उत्पादकांची परवड होत आहे. त्यामुळे शेतीला पूरक असलेला हा उद्योग बंद करावा का असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. 

दुधाचे दर १५ एप्रिल रोजी ३२ रुपये प्रति लिटर होता. तर लॉकडाऊनची घोषणा होताच १६ एप्रिलला २७ रुपये झाला. आणि २१ एप्रिलला २५ रुपयांपर्यंत घसरला. त्यात पुन्हा कपात होत १ मे रोजी २३ रुपये व ११ मे ला २१ रुपये प्रतिलिटर झाला. महिन्यापेक्षा कमी कालावधीतच दरात तब्बल ११ रुपयांची कपात करण्यात आली. त्यातच ५० किलो सरकी पेंड १७०० ते १८०० रुपयांवर पोहचली. त्यामुळे दुधाच्या पैशातून पशुखाद्याची बरोबरी सुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे 

जनावरे विकताही येईना अन् सांभाळताही येईना 
लाखगंगा (ता. वैजापूर) येथील दूध उत्पादक राजेंद्र तुरकने म्हणाले, की एकीकडे हिरव्या चाऱ्याचे भाव, सरकी पेंडचे भाव गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे दुधाची परिस्थिती फार वाईट आहे. एक लिटर दुधाला सरासरी १९ ते २० रुपये दर मिळतो. एक गाय आपण सरासरी १५ लिटर दूध जरी धरले तरी त्या दुधाचे पैसे ३०० रुपये रोज होतात. एका गाईला चार किलो सरकी पेंड १४० ते १५० रुपये लागते. हिरवा चारा कमीत कमी शंभर रुपये व कोरडा चारा पन्नास रुपये धरला तर सर्व मिळून तीनशे रुपयाचे खाद्य लागते. आमची मेहनत ही फुकट जाते. आमच्याकडून २० रुपयाने खरेदी करून ४५ रुपयाने विकल्या जाते. 
 
प्रतिक्रिया 
दुधाचे भाव पडल्याने आता मोठी पंचायत झाली आहे. जनावरांना लागणारे खाद्य देखील पुरात नाही. दुधाला भाव नसल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. 
- राजू हारकळ, शेतकरी, परतूर, जि. जालना 

दुधाचे भाव पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. यातच कांदा जाग्यावर सडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे. 
- योगेश जईद, शेतकरी, परतूर, जि. जालना 
 


इतर अॅग्रो विशेष
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...