agriculture news in Marathi farmers trying to become regular loner Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांची नियमित कर्जदार होण्यासाठी धडपड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 मार्च 2021

२०२० ते २१ या आर्थिक वर्षाची अखेर आल्यामुळे पीक कर्जदार शेतकऱ्यांची कर्ज भरून थकबाकीदार न होता नियमित कर्जदार होण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड चालली आहे.

आटपाडी, जि. सांगली ः २०२० ते २१ या आर्थिक वर्षाची अखेर आल्यामुळे पीक कर्जदार शेतकऱ्यांची कर्ज भरून थकबाकीदार न होता नियमित कर्जदार होण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड चालली आहे. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेने नवीन सातबारा उतारा, स्वयंघोषणापत्र आणि इतर बॅंकांचे दाखले जमा करण्यासह वेगवेगळी फर्माने काढल्यामुळे पीक कर्ज भरून नवीन मिळेल का? यावरून शेतकऱ्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पीक कर्ज भरण्यासाठी येणारे अनेक शेतकरी बॅंकेच्या नवीन फर्मानाने माघारी परतू लागलेत.

आटपाडी तालुक्‍यात डाळिंब, द्राक्ष, ज्वारी, बाजरी आणि ऊस पिकासाठी जिल्हा बॅंकेने सोसायटीच्या माध्यमातून ९० कोटींच्या दरम्यान पीक कर्जाचे वाटप केले आहे. यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जाहीर केलेली अवकाळी नुकसान भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. विम्याचा पत्ता नाही. तसेच नियमित कर्जदारांसाठी जाहीर केलेली प्रोत्साहन अनुदानाची अंमलबजावणी नाही.

या साऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक कर्ज भरण्यासंदर्भात अगोदरच उदासीनता आहे. त्यात जिल्हा बॅंकेने यंदा कागदपत्रांचे नवीनच फर्मान काढून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाची अखेर तोंडावर आली आहे. पीककर्ज भरून नियमित कर्जदार होण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची जुळवाजुळव चालली आहे. पाहुण्यांकडून उसनं, पासनं घेऊन, सोने तारण ठेवून, खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन पैशाची जुळणी चालली आहे. 

बहुतांश शेतकऱ्यांनी इतर स्थानिक बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. दीड वर्षापासून अतिवृष्टी कोरोना यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गाडा रुजलेला आहे. त्यामुळे स्थानिक बॅंकांचे सारेच हप्ते वेळेत गेले नाहीत. पीक कर्ज भरल्यावर इतर बॅंकांचे हप्ते थकले असल्यास नव्याने कर्ज मिळणार नाही असा तुघलकी फर्मान काढल्याने शेतकरी संभ्रमात आहे. यावर्षी पहिल्यांदाच बॅंकेने पीक कर्ज भरणाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. याचा कर्जवसुली वर गंभीर परिणाम होणार आहे.

कागदपत्रांची जंत्री
कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन सातबारा उतारा, उताऱ्यावरील पीक पाणी, उताऱ्यावर नव्याने बोजा नोंदवणे, इतर बॅंकांची कर्जाची नोंद असल्यास त्याचे दाखले, स्वयंघोषणापत्र जमा करण्याचे फर्मान काढले आहे. तरच कर्ज देऊ तसेच कर्ज भरणाऱ्यांना नव्याने कर्जाची हमी दिली जात नाही. स्वयंघोषणा पत्रामध्ये जाचक अटी घातल्या असून यामध्ये शासनाकडून येणारे विविध प्रकारचे अनुदान, अवकाळी भरपाई, विमाभरपाई, ठिबक सिंचन अनुदान, उसाचे बिल आल्यास पीक कर्जाला जमा करण्यास हरकत नाही, याचा समावेश केला आहे.

प्रतिक्रिया
कर्ज माफीचा झालेला घोटाळा, दोन दोन ठिकाणी घेतलेले पीक कर्ज यामुळे बॅंकेच्या प्रशासनाने कागदपत्र घेण्याचे जिल्हाभर आदेश दिलेत. उताऱ्यावर ज्या बॅंकेचा बोजा असेल त्याचा दाखला देणे बंधनकारक आहे. थकबाकी असेल तर नव्याने पीक कर्ज देता येणार नाही.
- मनोहर साळुंखे, व्यवस्थापक, आटपाडी शाखा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...