agriculture news in Marathi farmers turn to Experimental farming Maharashtra | Agrowon

कृषी सचिवांच्या गावातील शेतकऱ्यांचा कल प्रयोगशीलतेकडे

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मूळगावी माळवंडी (जि. बुलडाणा) येथे शेतकरी विविध प्रयोग करू लागले आहेत. 

अकोला ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मूळगावी माळवंडी (जि. बुलडाणा) येथे शेतकरी विविध प्रयोग करू लागले आहेत. यंदा या गावातील शेतकरी शंभर एकरांवर कांदा बीजोत्पादन करीत असून, यासाठी नियमितपणे शेतीशाळा वर्ग सुरू करण्यात आला आहे. श्री. डवले यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला असून, ते कांदा लागवडीवर लक्ष ठेवून आहेत.

माळवंडी गावात यंदा १०० एकरांवर कांदा बीजोत्पादन केले जाणार असून, जवळपास हजार क्विंटल कांद्याची लागवड केली जात आहे. दर्जेदार बीजोत्पादन करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने या गावात शेतीशाळा आयोजित केली आहे. तज्ज्ञ म्हणून कृषी सहायक विठ्ठल धांडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. 

शुक्रवारी (ता. २०) माळवंडी येथे कांदा बीजोत्पादन शेतीशाळेचा दुसरा वर्ग झाला. या वेळी बुलडाणा दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांनीही धावती भेट दिली. श्री. डवले यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात श्री. डवले यांच्या शेतावर मोसंबी लागवड, डॉलर हरभरा, कांदा बीजोत्पादन लागवड व वेस्ट डीकम्पोझर आदींची पाहणी करून सविस्तर चर्चा झाली.
 


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...