मोगरा शेतीतून शेतकऱ्यांनी शोधला उत्पन्नाचा सुगंधी मार्ग

गटशेती अंतर्गत नोंदणी केलेले मोगरा उत्पादकांसाठी विक्री व्यवस्था व प्रक्रिया केंद्रासाठी आत्मा, नाशिक यांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. - शिलानाथ पवार, तालुका कृषी अधिकारी, पेठ
मोगरा शेती
मोगरा शेती

नाशिक : पिकवलेल्या भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने पर्याय म्हणून पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोगरा फूलशेतीचा मार्ग निवडला. आदिवासी बांधवांनी जिद्द बाळगत कमी पाण्यातही प्रयत्नांची पराकाष्ठा करत तब्बल ४० हजार रोपांची लागवड केली आहे आहे. मोगरा लागवडीसाठी श्रीमंत आदिवासी शेतकरी गटाने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मदतीने प्रोत्साहित केले आहे. हे शेतकरी तांदूळ, इंद्रायणी, नागली, गहू, वरई, भगर, कुळीद, उडीद, दाळ, आंबा आदी पिके सेंद्रिय पद्धतीने घेत असायचे. त्यात बाजारभावात चढउतार होतात. त्यांनतर आदिवासी शेतकऱ्यांनी जव्हार, मोखाडा, पालघर या ठिकाणी जाऊन मोगरा फूलशेतीचा अभ्यास केला. श्रीमंत शेतकरी गटाने इच्छुक शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून दिली. उन्हाळ्यात पेठ तालुक्यात पाणीटंचाई भासत असल्याने पाण्याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी दोन, चार ते सहा गुंठा जागेत मोगरा रोपांची लागवड केली. त्यामुळे परिसरात मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे. मोगरा शेती बाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.... सध्या मोगऱ्याचे दररोजचे उत्पादन मर्यादित असल्याने व्यक्तिगत विक्रीसाठी शहरात आणणे खर्चिक आहे. यावर पर्याय शोधत तो एकत्रितपणे विक्रीसाठी आणला जातो. तोडलेल्या मोगऱ्याच्या कळ्या मध्यवर्ती ठिकाणी करंजाळी गावात जमा करून शहरातील फूलबाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. बाजारात मिळालेल्या भावाप्रमाणे प्रत्येकाला मालाचे पैसे वाटप करण्यात येतात. मिळणाऱ्या उत्पन्नावरून मोगरा शेती फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. पेठ तालुक्यातील करंजाळी, शिंगदरी, निरगुडे, गावंधपाडा, गयधोंड, उभीधोंड, देवगाव, आड, कोहोर, गोंदे जळीतहोड या गावांमधील ४० शेतकऱ्यांनी लागवड केली असून अजूनही जवळपास ६० शेतकरी लागवडीसाठी इच्छुक असून, त्यांनी श्रीमंत शेतकरी गटाकडे लागवडीसाठी नोंदणी केली आहे. मोगऱ्याच्या फुलाचा उपयोग गजरे, माळा यासाठी दररोज मागणी असते. लग्नसराई, सणोत्सवाच्या काळात अधिक उठाव असतो. मात्र याखेरीज औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती व सुगंधी अत्तर निर्मितीकरिता त्याला मागणी असल्याने मालाबाबत शेतकऱ्यांकडे पुरवठ्यासाठी मागणी होत आहे. पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोगरा विकण्यासाठी नाशिक, मुंबई यांसह गुजरातमधील सुरत मार्केट हे जवळ आहे. मात्र कळ्या अधिक खुलल्यानंतर बाजारमूल्य कमी असल्याने प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मोगरा फुलांचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. असे मिळते उत्पन्न

  •    प्रति झाड प्रतिदिन उत्पादनः ५० ते २५० ग्राम
  •    ५०० रोपांपासून मिळणारे उत्पादनः १० ते १५ किलो
  •    प्रति किलो सरासरी भावः २०० ते १५०० रुपये
  •    एक झाडाचा उत्पादन कालावधीः १० ते १२ वर्षे
  •    हंगामः वर्षभरात सलग ८ महिने
  • प्रतिक्रिया

    कळ्या फुलल्यानंतर विक्रीमध्ये अडचण येते. त्यामुळे मोगरा फुलाच्या प्रक्रिया उत्पादनासाठी शासन व आदिवासी विकास विभागाकडून आम्हाला मदत अपेक्षित आहे.  - यशवंत गावंडे, अध्यक्ष, श्रीमंत आदिवासी शेतकरी गट

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com